S M L

असा सत्तासंघर्ष, दिवसभरात काय घडल्या घडामोडी ?

Sachin Salve | Updated On: Nov 9, 2014 10:28 PM IST

असा सत्तासंघर्ष, दिवसभरात काय घडल्या घडामोडी ?

09 नोव्हेंबर : आजचा सण्डे राजकीय घडामोडींचा ठरला. भाजपबरोबर संबंध तोडणार की नाही, याबद्दलची भूमिका शिवसेनेनं आजही जाहीर केली नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात याकडे शिवसैनिकांसह राज्यातल्या तमाम जनतेचं लक्ष होतं. पण शिवसेनेनं भाजपच्या कोर्टात चेंडू ढकलत आजही काही थेट निर्णय घेतला नाही. पण त्यांनी भाजपला 12 नोव्हेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. राष्ट्रवादीने देऊ केलेल्या पाठिंब्याच्या मुद्द्यावरूनही त्यांनी भाजपला भूमिका स्पष्ट करायला सांगितलंय. दिल्लीत केंद्रीय मंत्रिमं़डळ विस्तारानंतर मुंबईत राजकीय घडामोडींना आज वेग आला. नेमकं दिवसभर काय घडलं त्यांचा हा धावता आढावा...

काय घडल्या घडामोडी?

- अमित शहा आणि उद्धव ठाकरेंमध्ये शनिवारी रात्री चर्चा

- शिवसेनेला 1 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रिपदांचं आश्वासन

- उद्धव ठाकरेंचा अनिल देसाईंना सकाळी 10 वाजता फोन

- अनिल देसाई सपत्निक दिल्लीला रवाना

- पण दिल्लीला गेल्यानंतर अंतिम निर्णय घेऊ, उद्धव ठाकरेंचा निरोप

- 12.45 च्या सुमारास अनिल देसाई दिल्ली विमानतळावर

- 1 वाजता अमित शहांचा उद्धव ठाकरेंना पुन्हा फोन

- आता 1 राज्यमंत्रिपद आणि 6 महिन्यांनंतर दुसरं पद देणार असल्याचं सांगितलं

- उद्धव ठाकरेंनी प्रस्ताव फेटाळला

- शिवसेनेचा शपथविधी कार्यक्रमावर बहिष्कार

- अनिल देसाई मुंबईकडे परतले

- मातोश्रीवर शिवसेना नेत्यांची बैठक

- शिवसैनिकांची विमानतळ, शिवसेना भवनाबाहेर निदर्शनं

- अमित शहांच्या विरोधात सेनाभवनाबाहेर घोषणाबाजी

- शिवसेना भवनावर उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद

- उद्धवंनी पाठिंब्यांचा निर्णय भाजपच्या कोर्टात ढकलला चेंडू

- उद्धवंनी दिला 12 नोव्हेंबरपर्यंतचा भाजपला अल्टिमेटम

- शिवसेनेनं मोदींवर विश्वास ठेवायला पाहिजे होता -मुख्यमंत्री

- शिवसेनेच्या निर्णय दुदैर्वी -मुख्यमंत्री

- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार उद्या सोमवारी घेणार पत्रकार परिषद

- भाजपला पाठिंबा देण्याबाबत करणार भूमिका स्पष्ट

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 9, 2014 10:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close