S M L

काँग्रेसच्या विधीमंडळ गटनेतेपदी राधाकृष्ण विखे-पाटील

Samruddha Bhambure | Updated On: Nov 10, 2014 11:39 AM IST

काँग्रेसच्या विधीमंडळ गटनेतेपदी राधाकृष्ण विखे-पाटील

10 नोव्हेंबर :  काँग्रेसने विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी सोमवारी राधाकृष्ण विखे-पाटील यांची निवड केली. त्याचबरोबर उपनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची निवड करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिली.

विधानसभेतील गटनेतेपदासाठी अहमदनगर जिल्ह्यातील बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यात चुरस होती. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेतील गटनेतेपद मिळवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. मात्र, थोरात काहीसे मवाळ प्रवृत्तीचे असल्यामुळे सभागृहात जनतेचे प्रश्न ते आक्रमकपणे मांडू शकतील का, याबाबत पक्षश्रेष्ठींमध्ये साशंकता होती. त्या दृष्टीनेही राधाकृष्ण विखे-पाटील यांची निवड करण्यात आल्याचे समजते.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 10, 2014 11:19 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close