S M L

डेंग्यू मलेरियाच्या रुग्णांना पपई खाण्याचा डॉक्टरांचा सल्ला

Samruddha Bhambure | Updated On: Nov 10, 2014 03:00 PM IST

डेंग्यू मलेरियाच्या रुग्णांना पपई खाण्याचा डॉक्टरांचा सल्ला

10  नोव्हेंबर :  डेंग्यू आजारांच्या रुग्णांना नियमित औषधोपचारांबरोबरच पपई खाण्याचा सल्ला डॉक्टरांकाढून दिला जात आहे आणि त्यामुळे पपईला अचानक मोठी मागणी आली आहे. घाऊक बाजारात केवळ 15 रुपये किलोने विकण्यात येणारी पपई किरकोळ बाजारात चक्क 35 ते 40 रुपये प्रतिकिलोने विकली जात आहे. ठाणे परिसरात मलेरिया, डेंग्यू आजारांमुळे रुग्णांच्या रक्तातील प्लेटलेट झपाटय़ाने कमी होत असल्याने डॉक्टरांकडून पपई खाण्याचा सल्ला दिला जात आहे.

आयुर्वेदात पपई आणि पपईच्या पानांचा रस हा गुणकारी मानण्यात आला असून रक्तातील प्लेटलेट वाढविण्यासाठी उपकारक ठरत असल्याचे डॉक्टारांनी सांगितले. राज्यातील अनेक शहरांत डेंग्यू आणि मलेरिया या साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. अनेक रुग्ण शासकीय तसेच खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. जनजागृती, डास फवारणी जोरात सुरू झाली आहे. डेंग्यू आणि मलेरियामुळे शरीरातील प्लेटलेटचे प्रमाण कमी होत असून रुग्ण दगावण्याची शक्यता वर्तवली जात आहे, त्यामुळेच पपईलाही वाढती मागणी आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 10, 2014 10:14 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close