S M L

हिंगोलीत आठवड्याभरात पाच शेतकर्‍यांच्या आत्महत्या

Sachin Salve | Updated On: Nov 10, 2014 03:30 PM IST

farmmer10 नोव्हेंबर : अपुरा पावसामुळे केलेली पेरणी वाया गेल्याने हिंगोली जिल्ह्यात एकाच आठवड्यात पाच शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आलीये. पाच शेतकर्‍यांच्या आत्महत्येनं हिंगोलीत खळबळ उडाली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील पारडी सावळी इथल्या सोपानराव सांगळे या शेतकर्‍यानं आत्महत्या केली आहे.आतापर्यंत एका आठवड्यात सेनगाव तालुक्यातील खुडच येथील नवनाथ घोसीर,कळमनुरी तालुक्यातील गौळ बाजार येथील राजू कदम,तर एकट्या औंढा नागनाथ तालुक्यात तीन शेतकर्‍यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. यामध्ये अनखळी वाडी येथील मारोतराव चाटे, तर पारडी सावळी येथील सोपानराव सांगळे आणि पारडी सावळी येथेच नापिकीमुळे पिक आले नाही आता मुलीचे लग्न कसे करायचे या विवंचनेत आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. गेल्या दोन महिन्यांपासून सोयाबीन उत्पादकांचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. आता नव्या सरकारकडून तरी शेतकर्‍यांना तातडीने मदत मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 10, 2014 03:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close