S M L

'पॉवर' प्ले, राष्ट्रवादीचा भाजपला अप्रत्यक्ष पाठिंबा

Sachin Salve | Updated On: Nov 10, 2014 06:53 PM IST

'पॉवर' प्ले, राष्ट्रवादीचा भाजपला अप्रत्यक्ष पाठिंबा

10 नोव्हेंबर : भाजप सरकार बहुमत सिद्ध करण्यासाठी कमी पडलं तर दुसरी कुठलीही पर्यायी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे पुन्हा एक दा विधानसभा निवडणुकीला सामोरं जावं लागेल आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला, प्रशासनाला हे न परवडणार आहे. त्यामुळे हे सरकार अस्थिर होईल असा प्रयत्न आम्ही करणार नाही असं स्पष्ट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला अप्रत्यक्ष पाठिंबा जाहीर केलाय. तसंच आम्ही कुणाला मतदान करावं, कुणाला करू नये हे इतरांनी आम्हाला शिकवू नये, तुम्हाला जर मुद्दा पटत नसेल तर विरोधात बसा असा खोचक टोला शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता लगावला. आज मुंबईत शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन रोखठोक भूमिका मांडली. तासभर रंगलेल्या या पत्रकार परिषदेत पवारांनी पत्रकारांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तर दिली.

'भाजपने जर राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला तर आम्ही विरोधी बाकावर बसू' अशी भूमिका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडल्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी काय भूमिका घेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. विशेष म्हणजे राष्ट्रवादीने अगोदरच भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे राष्ट्रवादी विधानसभेत आता विश्वादर्शक ठरावाच्या वेळी काय भूमिका घेते याचा खुलासा आज (सोमवारी) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केला. भाजप सरकार बहुमत सिद्ध करण्यासाठी कमी पडलं तर दुसरी कुठलीही पर्यायी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे पुन्हा एक दा विधानसभा निवडणुकीला सामोरं जावं लागेल आणि जर दोन-तीन महिन्यांनंतर जर निवडणुकीला सामोरं जावं लागलं तर महाराष्ट्राच्या प्रशासन, अर्थव्यवस्थेला न परवडणार आहे. त्यामुळे साधारणात : आमचा प्रयत्न असा राहिल हे सरकार योग्य पद्धतीने जिथे पावलं टाकत असेल तर सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न आम्ही करणार नाही असं स्पष्ट मत शरद पवारांनी व्यक्त केलं. तसंच राष्ट्रवादीचे आमदार विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी कुणाला मतदान करायचं नाही याचा निर्णय ते घेतील. एखाद्या वेळेस विधेयकाला आमचा विरोध असेल तर आमचे आमदार तिथे विरोधात मतदानदेखील करतील असा खुलासाही शरद पवारांनी केला.

इतरांनी आम्हाला शिकवू नये, पवारांचा उद्धवंना टोला

त्यांनंतर पवारांनी शिवसेनेकडे आपला मोर्चा वळवला. आम्ही कुणालाही पाठिंबा देण्याबाबत कुणाशी चर्चा केली नाही. आम्हाला काय निर्णय घ्यायचा आहे तो आम्ही घेऊ आणि हा आमच्या पक्षाच प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही कुणाला मतदान करावं हे इतरांनी सांगू नये असं सांगत पवारांनी उद्धव ठाकरे यांचं नाव घेता टोला लगावला. हो, मी भगवा दहशतवादाचा शब्द वापरा होता. पण तो मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर हा शब्दप्रयोग केला होता. जर महाराष्ट्रात देशविघातक परिस्थिती निर्माण झाली असले तर केंद्रीय गृहमंत्र्यांनी आम्ही विनंती करतो की, त्यांनी राज्यात लक्ष घालावं असंही शरद पवार म्हणाले. एकाप्रकारे शरद पवार यांनी आता भाजपला अप्रत्यक्षपणे पाठिंबा जाहीर केला आहे. आता भाजप राष्ट्रवादीचा पाठिंबा घेते का हे पाहण्याचं ठरेल.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 10, 2014 06:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close