S M L

अक्कू यादव हत्येप्रकरणी 18 आरोपींची निर्दोष सुटका

Sachin Salve | Updated On: Nov 10, 2014 09:31 PM IST

अक्कू यादव हत्येप्रकरणी 18 आरोपींची निर्दोष सुटका

akku_yadav10 नोव्हेंबर: देशात खळबळ उडवणार्‍या अक्कू यादव प्रकरणाचा आज ऐतिहासिक निकाल लागला. पुराव्याअभावी 18 आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आलीय. 13 ऑगस्ट 2004 रोजी नागपूरच्या कोर्टात गुंड अक्कू यादवचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी 7 महिलांसह 21 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल होता.

दहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अक्कू यादव हत्येप्रकरणी नागपूर सत्र न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही टी सूर्यवंशी यांनी सर्व 18 आरोपींनी निर्दोष सुटका केली. 13 ऑगस्ट 2004 रोजी नागपूरच्या जिल्हा न्यायालयाच्या आवारात जरीपटका कस्तुरबानगर येथील कुख्यात गुंड भारत ऊर्फ अक्कू कालीचरण यादव याचा संतप्त जमावाने चाकू, भाल्याचे पाते, गुप्ती आणि काचेने भोसकून व दगडाने ठेचून खून केला होता. खुनाच्या घटनेनंतर जमावाने अक्कूचे घरही जाळून टाकले होते. या प्रकरणी 7 महिलांसह 21 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल होता. दरम्यानच्या 10 वर्षांच्या काळात 3 आरोपींचे मृत्यूही झाले. अखेर या प्रकरणी कोर्टाने 18 आरोपींची निर्दोष सुटका केली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 10, 2014 07:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close