S M L

IPL स्पॉट फिक्सिंग : अहवालात नसलेली 'त्यांची' नावं कोर्टाकडे !

Sachin Salve | Updated On: Nov 10, 2014 11:50 PM IST

IPL स्पॉट फिक्सिंग : अहवालात नसलेली 'त्यांची' नावं कोर्टाकडे !

10 नोव्हेंबर : आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणाची सुनावणी आज (सोमवारी) सुप्रीम कोर्टाने शुक्रवारपर्यंत पुढे ढकलली आहे. 35 पानांच्या या मुदगल समिती अहवालात खेळाडूंची थेट नावं घेण्यात आली नाहीत. पण कोर्टाला ती वेगळ्या पद्धतीने कळवली गेली आहेत. त्यामुळे श्रीसंतसह अजून कोण-कोण कोणते खेळाडू या प्रकरणात अडकले आहे यांची नाव अजूनही गुलदस्त्यात आहे.

गेल्या आठवड्यात जस्टिस मुकुल मुदगल यांनी सुप्रीम कोर्टाला बंद लिफाफ्यात आपला अहवाल सादर केला होता. पण हा संपूर्ण अहवाल आपण वाचला नसल्याचं सांगत कोर्टाने ही सुनावणी पुढे ढकलली. त्याचबरोबर लिफाफ्यात नमुद केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर केली जाऊ नये यावर दोन्ही बाजूच्या वकीलांचं एकमत झालंय. पण सुप्रीम कोर्टाने यावर काहीही भाष्य केलं नाहीये. 20 नोव्हेंबरला बीसीसीआयची निवडणूक होतेय. जर मुदगल समिती अहवालात श्रीनिवासन यांचं नावं नसेल तर या निवडणुकीत श्रीनिवासन यांना लढण्याचा अधिकार द्यावा अशी मागणी बोर्डाकडून केली गेली. तर कोर्टाने याप्रकरणी थेट निरिक्षण देणं टाळलंय. 35 पानांच्या या मुदगल समिती अहवालात खेळाडूंची थेट नावं घेण्यात आली नाहीत. पण कोर्टाला ती वेगळ्या पद्धतीनं कळवली गेली आहेत.

दरम्यान,सुप्रीम कोर्टाने आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी श्रीनिवासन यांच्या विरोधात कोणतंही निरिक्षण नोंदवलं नाहीये. पण 20 नोव्हेंबरला होणार्‍या बोर्डाच्या निवडणूकीची तयारी मात्र श्रीनिवासन यांनी सुरू केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीनिवासन यांनी अध्यक्षपदाच्या या निवडणूकीसाठी 3 प्रस्ताव तयार ठेवले आहेत. यावेळी पूर्व विभागाकडे अध्यक्षपदाची धुरा जाणार आहे. पण श्रीनिवासन यांनी याअगोदरच लॉबिंग करुन पूर्व विभागाच्या 6 बोर्डांकडून पाठिंबा मिळवलाय. त्यामुळे जर सुप्रीम कोर्टाने श्रीनिवासन यांना परवानगी दिली, तर बोर्डाच्या सर्वसाधारण सभेत ते अध्यक्षपदाच्या शर्यतीतील सर्वात प्रमुख दावेदार असतील यात शंका नाही.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 10, 2014 11:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close