S M L

'त्या' गावावर अग्नितांडव, घरातील वस्तू अचानक घेतात पेट !

Sachin Salve | Updated On: Nov 11, 2014 04:04 PM IST

'त्या' गावावर अग्नितांडव, घरातील वस्तू अचानक घेतात पेट !

osmanabad_black_magic11 नोव्हेंबर : राज्यात अंधश्रद्धा विरोधी कायदा लागू झाला असला तरी समाजातील अंधश्रद्धाच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. उस्मानाबादमध्ये लोहारा तालुक्यातील कास्ती खुर्द गावात गेल्या 4 दिवसांपासून घरातील वस्तूंना अचानकपणे आग लागत आहे. या घटनामुळे संपूर्ण गाव दहशतीखाली आहे. घरात लागलेली आग म्हणजे भानामतीचा प्रकार आहे असं गावकरी उघडपणे सांगत आहेत. याबाबत पोलिसांत तक्रार देऊनही अंधश्रद्धेच्या या प्रकाराकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यात कास्ती खुर्द या गावात गेल्या 4 दिवसापासून विचित्र प्रकार घडत आहेत. या गावातील काही घरांमध्ये भर दिवसाघरातील वस्तू व साहित्यांना अचानकपणे आग लागत आहे. ही आग सहजासहजी विझवली जात नाही. हा प्रकार म्हणजे करणी ,भानामती आहे असं गावकरी सांगत आहे. या प्रकारामुळे गावकरी दहशतीखाली असून दिवसरात्र झोपत नाहीत. पूर्ण गाव रस्तावर येऊन थांबत आहे.

आम्ही इथं गेल्या चारवर्षांपासून राहतो पण कधी असं घडलं नाही. आग कुणी लावली हे दिसत नाही, आग लावतांना कोणताही माणूस दिसत नाही. दिवसांतून तीन ते चार वेळा असं घडतंय. आग लागल्यावर पाणी जरी ओतलं तरी आग विझत नाही. आगीवर गवत टाकलं तर आग लगेच विझते. आम्ही अत्यंत गरीब लोक आहोत, या प्रकारामुळे ना आम्हाला घरात राहता येत नाही ना रस्तावर थांबताय येईना प्रशासनाने आमची मदत करावी अशी मागणी इथल्या गावकर्‍यांनी केलीये. हा प्रकार म्हणजे करणीच असू शकतो असंही गावकरी सांगतायत.

पण, कुठलीही घटना ही आपोआप घडत नाही, काळी जादू, करणी अथवा भानामती असे प्रकार अजिबात नसतात कुठल्याही घटनेमागे कुणाचा तरी खोडसाळपणा असू शकतो. त्यामुळे कास्ती गावातील गावकर्‍यांनी अशा प्रकाराला थारा देवू नये व प्रशासनाने तात्काळ याची दखल घेऊन सत्य बाहेर आणावे व गावकरीच्या मनातील भीती दूर केली पाहिजे असं आव्हान अंनिसच्या कार्यकर्त्यांनी केलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 11, 2014 03:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close