S M L

» आमच्या विरोधात शंका असल्यास अविश्वास प्रस्ताव आणावा -फडणवीस

Samruddha Bhambure | Updated On: Nov 12, 2014 09:59 PM IST

» आमच्या विरोधात शंका असल्यास अविश्वास प्रस्ताव आणावा -फडणवीस

vidhan

LIVE UPDATES :

मुख्यमंत्र्यांचं काँग्रेसला आव्हान

काँग्रेसने अविश्वास प्रस्ताव आणावा आम्ही विश्वासमत सिद्ध करु - मुख्यमंत्र्यांचं काँग्रेसला आव्हान

मतविभाजनाची मागणी उचित वेळी कुठल्याही पक्षानं केली नाही - फडणवीस

आवाजी मतदानानं विश्वासदर्शक ठराव मंजूर झाला - फडणवीस

एकदा प्रस्ताव मंजूर झाल्यावर पुन्हा मतदान घेता येत नाही -फडणवीस

आमच्या विरोधात शंका असल्यास अविश्वास प्रस्ताव आणावा -फडणवीस

आम्ही विश्वासदर्शक प्रस्ताव पुन्हा जिंकून दाखवू -फडणवीस

यापूर्वीही विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानानं मंजूर झालाय -फडणवीस

आमच्या विरोधात शंका असल्यास अविश्वास प्रस्ताव आणावा -फडणवीस

काँग्रेसच्या आमदारांची वागणूक विधानसभेला काळीमा फासणारी -फडणवीस

राज्यपालांशी धक्काबुक्की चुकीची, त्यामुळेच कारवाई करावी लागली -फडणवीस

 

राज्यपालांना धक्काबुक्की, काँग्रेसचे 5 आमदार 2 वर्षांसाठी निलंबित

 राज्यपालांना धक्काबुक्की, काँग्रेसचे 5 आमदार 2 वर्षांसाठी निलंबित

काँग्रेसचे आमदार राहुल बोंद्रे, अब्दुल सत्तार, विरेंद्र जगताप, अमर काळे आणि जयकुमार गोरे यांचं निलंबन

विधानसभा अध्यक्षांच्या दालनासमोर अब्दुल सत्तार आणि गिरीश महाजन यांच्यात धक्काबुक्की

- राज्यपालांना धक्काबुक्की केल्याचा भाजपचा आरोप

- जर माफी मागितली नाही तर 12 आमदारांविरोधात निलंबनाची कारवाईची मागणी

- 12 आमदारांच्या व्हिडिओ क्लीप असल्याचा एकनाथ खडसेंचा दावा

- अनुचित प्रकार करण्याचा कोणताही हेतू नव्हता-राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया

राहुल बोंद्रे, जयकुमार गोरे, अमर काळे, अब्दुल सत्तार, माणिकराव ठाकरे या काँग्रेसच्या आमदारांनी राज्यपालांना धक्काबुक्की केल्याचा खडसेंचा आरोप

राज्यपालांच्या भाषणात सेना आमदारांची घोषणाबाजी

राज्यपालांच्या अभिभाषणावर काँग्रेसचा सभात्याग 

विश्वासदर्शक ठरावाचा वाद : विधानभवनात शिवसेनेच्याआमदारांनी राज्यपालांची गाडी अडवली 

राज्यपाल परत जा'च्या सेना आमदारांकडून घोषणा

विश्वासदर्शक ठरावाचा वाद : काँग्रेसनं पाठवलं राज्यपालांकडे पत्र

विश्वासदर्शक ठरावाचा वाद : सरकार घटनाबाह्य असल्याचा काँग्रेसने केला दावा

विश्वासदर्शक ठरावाचा वाद : सरकार घटनाबाह्य असल्यामुळे राज्यपालांनी अभिभाषण करू नये, काँग्रेसची विनंती

- सूत्रांची आयबीएन लोकमतला माहिती

- भाजप आणि राष्ट्रवादीत साटंलोटं?

- पाठिंब्याच्या बदल्यात विधानपरिषदेचं सभापतीपद आणि विरोधी पक्ष नेते पद राष्ट्रवादीला मिळणार ?

- त्यावेळी भाजप आडकाठी घेणार नाही

विरोधकांनी मतविभागणी मागितली नाही,त्यामुळे प्रस्ताव पारित - विनोद तावडे

विधिमंडळाच्या परंपरेनंच आजच कामकाम -विनोद तावडे

काँग्रेसचा रोख त्यांच्या जुन्या सहकार्‍यांवर -विनोद तावडे

बहुमत आमच्या बाजूने -विनोद तावडे

विधानसभेचे अध्यक्ष प्रस्ताव मताला टाकतात, त्यावर मतविभागणी मागितली तरंच मतविभाजनाची प्रक्रिया होते -विनोद तावडे

विरोधकांनी मतविभागणी मागितली नाही त्यामुळे प्रस्ताव पारित - विनोद तावडे

काँग्रेसने पोल योग्य वेळी मागितला नाही - विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे

आजचा सरकारवरचा विश्वासदर्शक ठरावं नियमानं -विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे

पोल योग्य वेळी मागितला नाही ही कॉंग्रेसची चूक - हरिभाऊ बागडे

विरोधी पक्ष नेता एकनाथ शिंदे यांची मीडियाशी बातचीत

- टीम म्हणून विरोधी पक्षाची जबाबदारी पार पाडणार

- सरकारला नियमबाह्य काम करू देणार नाही

- सरकारकडून काही नियमबाह्य गोष्टी झाल्यायत त्यांना रोखण्याचं काम आम्ही केलंय

- विरोधी पक्ष नेत्याची घोषणा डावलून विश्वासदर्शक ठराव मांडण्याचा प्रयत्न केला

- आजही सरकार अल्पमतात आहे की बहुमतात आहे हे स्पष्ट नाही

- सरकारनं गोंधळात प्रस्ताव मंजूर केला हे दुर्देवी, या प्रकाराचा निषेध

- महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय देण्याचं काम सरकार करत असेल तर सरकारला साथ देऊ

- पण सरकार नियमांची गळचेपी करत असेल, घटनेची पायमल्ली करत असेल तर आम्ही त्यांच्या विरोधात लढा देऊ

- महाराष्ट्र तोडण्याची भाषा करणार्‍यांचा आम्ही विरोध करू

- सरकारनं महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात केलाय

- राष्ट्रवादी-भाजपमध्ये काय डील झालंय ते आम्हाला कसं कळणार ?

- हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेतेपदावर आणि विधानपरिषदेच्या अध्यक्षपदावर दावा करणार

भाजप सरकारचं 8 डिसेंबरला पहिलं हिवाळी अधिवेशन

अध्यक्षांनी बनाव केला - दिवाकर रावते

सात वर्षांत पहिल्यांदाच असं घडलंय - दिवाकर रावते

अध्यक्षांनी पहिल्याच दिवशी नियमबाह्य काम केलं, त्यांचा आम्ही धिक्कार करतो -रामदास कदम

अध्यक्षांचं काम नियमबाह्य,अध्यक्षांचा धिक्कार - रामदास कदम

नियमांप्रमाणे मतदान झालं पाहिजे होतं -रामदास कदम

तुमच्यात हिंमत असेल तर पुन्हा विश्वासदर्शक ठराव मांडा -रामदास कदम

कोण कुणाच्या बाजूनं आहे ते कळू द्या, विश्वास असेल तर पुन्हा ठराव मांडा -रामदास कदम

नागपूरच्या अधिवेशनात सरकारला धारेवर धरणार - कदम

काँग्रेसला सोबत घेऊन सरकारला घेरणार - कदम

काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी चर्चा करणार -कदम

विधानसभेसाठी आज काळा दिवस -पृथ्वीराज चव्हाण

सभागृहात जे घडलं ते खेदजनक -पृथ्वीराज चव्हाण

आम्ही घटनेचा तीव्र निषेध करतो -पृथ्वीराज चव्हाण

सरकारच्या विश्वासहार्ततेवर शंका - पृथ्वीराज चव्हाण

सरकारनं पुन्हा विश्वासदर्शक ठराव मांडावा - चव्हाण

सरकार अल्पमतातच असल्यामुळे सहकार्य करण्याची गरजच नाही - चव्हाण

सरकारकडे बहुमत नाही - चव्हाण

विरोधी पक्षांनी मतदान मागितलं होतं पण अध्यक्षांनी मागणी फेटाळली - माणिकराव ठाकरे

अध्यक्षांची कार्यपद्धत चुकीची, सभागृहात लोकशाहीची हत्या - माणिकराव ठाकरे

भाजप बहुमत सिद्ध करू शकलं नाही - माणिकराव ठाकरे

फडणवीस सरकारनं राजीनामा द्यावा - माणिकराव ठाकरे

पहिल्याच दिवशी लोकशाहीची हत्या - माणिकराव ठाकरे

सरकारला पुन्हा बहुमत सिद्ध करावं लागेल - माणिकराव ठाकरे

अध्यक्षांच्या कार्यपद्धतीविरोधात राज्यपालांकडे तक्रार करणार -माणिकराव ठाकरे

हे सरकार चालू देणार नाही - माणिकराव ठाकरे

- मतदानाच्या मागणीवर शिवसेना आग्रही

- विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेण्याची केली मागणी

- दहा मिनिटांसाठी विधानसभा तहकूब

- शिवसेनेचे सर्व आमदार वेलमध्ये पोहचले

विश्वासदर्शक ठरावाला शिवसेनेचा विरोध

ज्या पद्धतीने विश्वासदर्शक ठराव मंजूर केला ते घटनाविरोधी,सेनेचा आक्षेप

कामकाजाची पद्धत योग्य नाही - शिवसेना

भाजपचं मिशन '145' फत्ते, विश्वासदर्शक परीक्षेत पास

विश्वासदर्शक ठरावाचा असा घडला घटनाक्रम..

अध्यक्षांची निवड झाल्यानंतर काही वेळातच भाजपचे आशीष शेलार यांनी मांडला विश्वासदर्शक ठराव

शिवसेनेनं आधी विरोधीपक्ष नेता निवडा अशी केली मागणी

त्यामुळं सभागृहात काही काळ गोंधळाचं वातावरण

त्या वातावरणातच आवाजी मतदानानं ठराव मंजूर

त्यानंतर एकनाथ शिंदे यांची विरोधीपक्षनेते म्हणून निवड

मतविभाजनाची मागणी झालीच नाही

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्र्यांनी मानाने विरोधी पक्ष नेतेपदाच्या खुर्चीत बसवलं

मुख्यमंत्र्यांनी केलं एकनाथ शिंदेचं अभिनंदन

विरोधी पक्ष नेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड अध्यक्षांनी केली घोषणा

कुठलंही मतदान न घेता आवाजी मतदानाने भाजपने विश्वासदर्शक ठराव जिंकला

आवाजी मतदानानं भाजपनं विश्वासदर्शक ठराव जिंकला

आवाजी मतदानानं भाजपनं विश्वासदर्शक ठराव जिंकला

कुठलंही मतदान न घेता आवाजी मतदानाने भाजपने विश्वासदर्शक ठराव जिंकला

विधानसभेत गदारोळ पहिले विरोधीपक्षनेता निवडा शिवसेनेने केली मागणी

विश्वासदर्शक ठरावापूर्वी विरोधी पक्षनेता निवडा, शिवसेनेची सभागृहात मागणी

विरोधी पक्षनेतेपदाच्या मागणीसाठी सेना आमदारांचा सभागृहात गोंधळ

थोड्याच वेळात विश्वासदर्शक ठराव मांडणार

भाजपच्या वतीने आशीष शेलार मांडणार प्रस्ताव

शिवसेना विरोधात मतदान करणार

तर राष्ट्रवादी प्रस्तावाच्या बाजूनं करणार मतदान

सर्व अपक्षांचा सरकारला पाठिंबा

मनसेनही दिला सरकारला पाठिंबा

सेनेचे नेते रामदास कदम आणि दिवाकर रावतेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मनसेचा भाजपला पाठिंबा, मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणेंचा भाजपला पाठिंबा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना नेत्यांशी केली चर्चा

मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचे मन वळवण्याचा शेवटचा केला प्रयत्न

मात्र शिवसेना विरोधातच मतदान करण्यावर ठाम

विधानसभेच्या पहिल्या तासातच विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार

भाजपचे नेते आशिष शेलार विश्वासदर्शक ठराव मांडणार

भाजप सरकारला सात अपक्षांचा पाठिंबा

राष्ट्रवादीकडे आम्ही गेलो नाही त्यांनीच आम्हाला पाठिंबा दिलाय, मग पाठिंबा का घेऊ नये ?-एकनाथ खडसे

विश्वासदर्शक ठरावात राष्ट्रवादी भाजपच्या बाजूनं मतदान करणार - सूत्र

भाजपचे उमेदवार हरिभाऊ बागडे यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोधी निवड

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोधी

काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाडे यांनीही घेतला अर्ज मागे

शिवसेनेचे अध्यक्षपदाचे उमेदवार विजय औटी यांनी घेतला अर्ज मागे

शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेनेशी चर्चा करण्याचा आमचा प्रयत्न आहे पण त्यांना विरोधात बसायचं असेल तर आमचा नाईलाज आहे - एकनाथ खडसे

राज्यपालांना धक्काबुक्की, काँग्रेसचे 5 आमदार 2 वर्षांसाठी निलंबित

देवेंद्र फडणवीस सरकारनं आज (बुधवारी) विश्वासदर्शक ठराव जिंकला. पण या महत्त्वाचा दिवसाला वादाचं गालबोट लागलं. काँग्रेसच्या 12 आमदारांनी राज्यपाल विद्यासागर राव यांना धक्काबुक्की केल्याचं समोरं आलं. या प्रकरणी काँग्रेसच्या 5 आमदारांना 2 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलंय. काँग्रेसचे आमदार राहुल बोंद्रे, अब्दुल सत्तार, विरेंद्र जगताप, अमर काळे आणि जयकुमार गोरे यांच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आलीये. तसंच या प्रकरणी सखोल चौकशी समितीही स्थापन करण्यात आली आहे.

  विश्वासदर्शक ठरावं नियमानेच मंजूर -हरिभाऊ बागडे

ते काय आरोप करताय ते करू द्या, पण विश्वासदर्शक ठराव नियमांनुसारच झाला आहे असं स्पष्टीकरण विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिलं. तसंच काँग्रेसने वेळेवर पोल दिला नाही, यात त्यांचीच चुकी आहे असंही बागडे यांनी सांगितलं.

हिंमत असेल तर पुन्हा ठराव मांडा -कदम

विधानसभेच्या अध्यक्षांनी पहिल्याच दिवशी नियमबाह्य काम केलंय, त्याचा आम्ही धिक्कार करतोय. नियमांप्रमाणे मतदान झालं पाहिजे होतं. तुमच्यात हिंमत असेल तर पुन्हा विश्वासदर्शक ठराव मांडून दाखवा ‘दूध का दूध पाणी का पाणी’ होऊ द्या असं थेट आव्हान शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी भाजपला दिलंय.

» भाजपचं मिशन ‘145’ फत्ते, विश्वासदर्शक परीक्षेत पास

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने ‘आवाज कुणाचा’ दाखवत अखेर मिशन 145 फत्ते केले आहे. फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठरावाची परीक्षा आज पास केलीये. विधानसभेत अभुतपूर्व गोंधळात आवाजी मतदानाने भाजपने विश्वासदर्शक ठराव जिंकलाय. आशिष शेलार यांनी विश्वासदर्शक ठराव विधानसभेत मांडला आणि त्यावर अध्यक्षांनी आवाजी मतदान घेत लगेल मंजूरही दिली. त्यामुळे आता फडणवीस सरकार अधिकृतपणे सत्तेवर विराजमान झाले असून पुढील सहा महिने सरकार चालवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

» मनसेसह अपक्षांचा भाजपला पाठिंबा

भाजप सरकारची आज कसोटी आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपला पाठिंब्याची गरज आहे. शिवसेनेनं पाठिंबा देण्यास नकार दिल्यानंतर राष्ट्रवादीने पुढाकार घेतला. आता मनसेसह इतर अपक्ष आमदारांनीही भाजपला पाठिंबा जाहीर केलाय.

विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी राष्ट्रवादी प्रमाणेचं मनसेनंही विनाअट भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुकीत मनसेचे एकमेव उमेदवार शरद सोनावणे मतदान करणार आहे. राज्यात स्थिर सरकार देण्यासाठी आम्ही सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय मनसेकडून सांगण्यात आलंय. त्याचं बरोबर इतर अपक्ष आमदारांनीही भाजपला पाठिंबा देऊ केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आपला पूर्ण विश्वास असून राज्यात स्थिर सरकार येणं गरजेचं आहे, म्हणूण आम्ही सर्व अपक्ष आमदार विश्वासदर्शक ठरावच्या वेळी भाजपच्या बाजूने मतदान करणार असं अमरावतीचे बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी स्पष्ट केलं. विशेष म्हणजे निकालानंतर भाजपने पाठिंब्यासाठी सर्व अपक्ष आमदारांना संपर्क साधला होता. अखेर त्याचे फलित म्हणजे सर्व अपक्ष भाजपच्या बाजून उभे राहिले आहे. पण जरी अपक्षांचा पाठिंबा मिळाला तरी संख्या 137 वर पोहचते. त्यामुळे पुढचा पेच कायम राहणार आहे.

राष्ट्रवादी भाजपच्या बाजूने मतदान करणार ?

शिवसेनेनं विरोधी बाकावर बसण्याचा निर्णय घेतल्यामुळे राष्ट्रवादीने पाठिंब्यासाठी आता एक पाऊल पुढे टाकले आहे. विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार भाजपच्या बाजूने मतदान करतील अशी माहिती सूत्रांनी दिलीये.

राष्ट्रवादीने मंगळवारी रात्री सर्व आमदारांना सभागृहात उपस्थिती राहण्याचा व्हिप जारी केला होता. पण मतदान कुणाच्या बाजून करायचं हे वेळेवर सांगण्यात येईल असं सांगण्यात आलं. आज (बुधवारी) विधानसभेच्या पहिल्या सत्रात विश्वादर्शक ठराव मांडला जाणार आहे. त्यावेळी राष्ट्रवादीचे आमदार भाजपला मतदान करतील अशी शक्यता आहे. दरम्यान, राष्ट्रवादीनेच स्वत:हुन आम्हाला पाठिंबा दिला आहे. आम्ही काही त्यांच्याकडे गेलो नव्हतो. त्यामुळे त्यांचा पाठिंबा घेण्यात अडचण नाही असं सूचक विधान भाजपचे नेते आणि महसूल मंत्री एकनाथ खडसे केलं. आता काही तासांतच विश्वादर्शक ठराव मांडला जाणार आहे नेमकं त्यावेळी काय घडतं हे पाहण्याचं ठरेल.

 

शिवसेना विरोधी बाकावर

 शिवसेना-भाजपमधील चर्चा अखेर निष्फळ ठरली असून विधानसभेत विरोधी पक्षात बसणार असल्याचा निर्णय शिवसेनेने घेतला असल्याचे शिवसेना नेते रामदास कदम यांनी बुधवारी जाहीर केले आहे. तसेच थोड्याच वेळात विधानसभेत मांडल्या जाणार्‍या भाजप सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात मतदान करणार असल्याचे रामदास कदम यांनी सांगितले.

शिवसेना नेत्यांनी मुंबई ते दिल्ली, दिल्ली ते मुंबई अशा अनेक फेर्‍या मारल्या मात्र गेल्या महिन्याभरात आम्हाला भाजपकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही. शिवसेना सत्तेसाठी स्वाभिमान गहाण ठेवणार नाही. मंगळवारी रात्रीपर्यंत भाजप नेत्यांनी आपली आडमूठी भूमिका कायम ठेवली त्यामुळे अखेर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवसेना विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतल्याचे रामदास कदम यांनी सांगितले. काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली. पण आता आमचा भाजपावर आणि अमित शहांवर विश्वास उरलेला नाही, त्यामुळे आम्ही तुमच्यामागे फरपटत येणार नाही, असे उद्धवजींनी देवेंद्र फडणवीस यांना स्पष्ट शब्दात सुनावले, असेही रामदास कदम यांनी सांगितले.

इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा विरोधी पक्ष म्हणून शिवसेना काम करणार आहे. शिवसेनेच्या विश्वासदर्शक ठरावात विरोधात मतदान करण्याच्या निर्णयामुळे भाजपला बहुमत सिद्ध करण्याच्या अडचणींत वाढ झाली आहे. आता राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 12, 2014 05:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close