S M L

हरिभाऊ बागडेंची अध्यक्षपदी बिनविरोध निवड

Sachin Salve | Updated On: Nov 12, 2014 11:54 AM IST

haribhau_bagade12 नोव्हेंबर : अखेर विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोधात पार पडली आहे. भाजपचे उमेदवार हरिभाऊ बागडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. अखेरच्या क्षणी शिवसेनेचे उमेदवार विजय औटी यांनी आपला अध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यांच्या पाठोपाठ काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा उमेदवार वर्षा गायकवाड यांनीही आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे हरिभाऊ बागडे यांची बिनविरोधी निवड झाली आहे. विधानसभेचे अध्यक्ष जीवा पांडू गावित हरिभाऊ बागडे यांची अध्यक्ष म्हणून घोषणा केलीये.

काँग्रेसने आणि शिवसेनेनं उमेदवार उभा केल्यामुळे विधानसभा अध्यक्षापदाची निवडणूक तिरंगी रंगणार असं स्पष्ट झालं होतं. पण आदल्या रात्री सूत्रं फिरली आणि सकाळी चित्र स्पष्ट झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांना फोन करून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली. आजपर्यंत विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक ही बिनविरोध झाली. त्यामुळे त्याचा विचार करावा अशी विनंती फडणवीस यांनी केली होती. आज (बुधवारी) सकाळी अर्ज घेण्याची मुदत 10 वाजेपर्यंत होती. त्या अगोदर सेनेचे नेते रामदास कदम यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत आहोत असं जाहीर केलं. पण विश्वादर्शक ठरावात भाजपच्या विरोधात मतदान करणार असंही कदम यांनी स्पष्ट केलं. सेनेच्या भूमिकानंतर काँग्रेसनेही आपला उमेदवार मागे घेतला. काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. अखेरीस दोन्ही पक्षांच्या समन्वयामुळे भाजपचे औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री मतदारासंघातील ज्येष्ठ आमदारा हरिभाऊ बागडे यांनी अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. दहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भाजपने ज्येष्ठतेनुसार हरिभाऊ बागडे यांना हा मान दिलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 12, 2014 11:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close