S M L

राष्ट्रवादी भाजपच्या बाजूने मतदान करणार ?

Sachin Salve | Updated On: Nov 12, 2014 02:08 PM IST

राष्ट्रवादी भाजपच्या बाजूने मतदान करणार ?

ncp_on_fadnvis4412 नोव्हेंबर : शिवसेनेनं विरोधी बाकावर बसण्याचा निर्णय घेतल्यामुळे राष्ट्रवादीने पाठिंब्यासाठी आता एक पाऊल पुढे टाकले आहे. विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार भाजपच्या बाजूने मतदान करतील अशी माहिती सूत्रांनी दिलीये.

राष्ट्रवादीने मंगळवारी रात्री सर्व आमदारांना सभागृहात उपस्थिती राहण्याचा व्हिप जारी केला होता. पण मतदान कुणाच्या बाजून करायचं हे वेळेवर सांगण्यात येईल असं सांगण्यात आलं. आज (बुधवारी) विधानसभेच्या पहिल्या सत्रात विश्वादर्शक ठराव मांडला जाणार आहे. त्यावेळी राष्ट्रवादीचे आमदार भाजपला मतदान करतील अशी शक्यता आहे. दरम्यान, राष्ट्रवादीनेच स्वत:हुन आम्हाला पाठिंबा दिला आहे. आम्ही काही त्यांच्याकडे गेलो नव्हतो. त्यामुळे त्यांचा पाठिंबा घेण्यात अडचण नाही असं सूचक विधान भाजपचे नेते आणि महसूल मंत्री एकनाथ खडसे केलं. आता काही तासांतच विश्वादर्शक ठराव मांडला जाणार आहे नेमकं त्यावेळी काय घडतं हे पाहण्याचं ठरेल.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 12, 2014 11:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close