S M L

मनसेसह अपक्षांचा भाजपला पाठिंबा

Sachin Salve | Updated On: Nov 12, 2014 12:09 PM IST

मनसेसह अपक्षांचा भाजपला पाठिंबा

12 नोव्हेंबर : भाजप सरकारची आज कसोटी आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपला पाठिंब्याची गरज आहे. शिवसेनेनं पाठिंबा देण्यास नकार दिल्यानंतर राष्ट्रवादीने पुढाकार घेतला. आता मनसेसह इतर अपक्ष आमदारांनीही भाजपला पाठिंबा जाहीर केलाय.

विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी राष्ट्रवादी प्रमाणेचं मनसेनंही विनाअट भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुकीत मनसेचे एकमेव उमेदवार शरद सोनावणे मतदान करणार आहे. राज्यात स्थिर सरकार देण्यासाठी आम्ही सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय मनसेकडून सांगण्यात आलंय. त्याचं बरोबर इतर अपक्ष आमदारांनीही भाजपला पाठिंबा देऊ केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आपला पूर्ण विश्वास असून राज्यात स्थिर सरकार येणं गरजेचं आहे, म्हणूण आम्ही सर्व अपक्ष आमदार विश्वासदर्शक ठरावच्या वेळी भाजपच्या बाजूने मतदान करणार असं अमरावतीचे बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी स्पष्ट केलं. विशेष म्हणजे निकालानंतर भाजपने पाठिंब्यासाठी सर्व अपक्ष आमदारांना संपर्क साधला होता. अखेर त्याचे फलित म्हणजे सर्व अपक्ष भाजपच्या बाजून उभे राहिले आहे. पण जरी अपक्षांचा पाठिंबा मिळाला तरी संख्या 137 वर पोहचते. त्यामुळे पुढचा पेच कायम राहणार आहे.

अपक्षांचा पाठिंबा घेतला तर ?

भाजप (122) इतर (8)(बहुजन विकास आघाडी-3,शेकाप-3,एमआयएम-2, सपा-1, मनसे-1) अपक्ष (7) = 137

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 12, 2014 12:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close