S M L

'भाजपकडून लोकशाहीचा खून, फडणवीस राजीनामा द्या'

Sachin Salve | Updated On: Nov 12, 2014 03:07 PM IST

'भाजपकडून लोकशाहीचा खून, फडणवीस राजीनामा द्या'

manikrao_thackeray12 नोव्हेंबर : भाजप सरकारने पहिल्याच दिवशी लोकशाहीचा खून केला. मतदान न घेता आवाजी मतदान घेऊन अध्यक्षांनी नियमांची पायमल्ली केलीये. त्यामुळे फडणवीस सरकारने राजीनामा द्यावी अशी मागणी काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी केलीये.  हे सरकार चालू देणार नाही व अध्यक्षांच्या कार्यपद्धतीविरोधात राज्यपालांकडे तक्रार करणार असल्याचंही ठाकरे यांनी म्हटलंय.  तसंच आज विधानसभेसाठी हा काळा दिवस आहे अशी संतप्त प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

विधानसभा अध्यक्षपदी भाजपचे हरिभाऊ बागडे यांची बिनविरोधी निवड झाली. आणि काहीवेळातच भाजपने आवाजी मतदानात विश्वासदर्शक ठराव मंजूर केला. सभागृहात प्रचंड गदारोळात भाजपने बहुमत सिद्ध केले. मात्र काँग्रेसने या घटनेचा विरोध केला आहे. यासंदर्भात बोलताना, ''विरोधी पक्षांनी मतदान मागितलं होतं पण अध्यक्षांनी मागणी फेटाळली व आवाजी मतदानाने बहुमत सिद्ध केले. अध्यक्षांची ही कार्यपद्धत चुकीची आहे. त्यांनी सभागृहात पहिल्याच दिवशी लोकशाहीची हत्या केली आहे. त्यामुळे फडणवीस सरकारनं राजीनामा द्यावा", अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केली. तसंच, हे सरकार चालू देणार नाही व अध्यक्षांच्या कार्यपद्धतीविरोधात राज्यपालांकडे तक्रार करणार असल्याचंही ठाकरे यांनी म्हटलंय.

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही, 'विधानसभेसाठी आज काळा दिवस' अशा शब्दात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सभागृहात जे घडलं ते खेदजनक आहे. आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो, असेही त्यांनी यावेळी म्हटलं. सरकारकडे बहुमतच नाही. सरकार अल्पमतातच असल्यामुळे सहकार्य करण्याची गरजच नाही, तसेच सरकारच्या विश्वासहार्ततेवर शंका असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 12, 2014 03:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close