S M L

अजित पवार यांना पाटबंधारे खात्याचा दणका

19 जून जलसंपदा खात्याचे मंत्री अजित पवार यांना त्यांच्याच खात्याने मुळा नदीत खांब बांधायला दिलेली परवानगी रद्द करून चांगलाच दणका दिला आहे. अजित पवारांचं मुळा नदीच्या तीरावर घोटावडे फार्म हाऊस बंगला बांधण्याचं काम सुरू होतं. याच ठिकाणी मुळा नदीच्या पात्रात खांब टाकून फूट ब्रिज बांधला जाणार होता. नदीच्या एका तीरावरून दुसरीकडे जाण्यासाठी हा फूटब्रीज होता. फायर पॉवर ऍग्रो ही अजित पवारांच्या पत्नीची कंपनीच हा ब्रीज बांधत होती. त्यासाठी मुळा नदीत दोन खांब बांधण्याची परवानगी देण्यात आली होती. पण याला आक्षेप येऊ शकतो हे लक्षात घेऊन ही परवानगी पाटबंधारे खात्याने रद्द केली आहे. त्यावेळी पाटबंधारे खात्याने मान्य केलं की मुळा नदीतून गाळ काढण्यासाठी अजित पवारांना परवानगी दिली गेली होती. मात्र ही परवानगी पावसाळा लक्षात घेऊन देण्यात आली असं पाटबंधारे खात्याचं म्हणणं आहे. पावसाळ्यापूर्वी नदीतून गाळ काढण्यासाठी परवानगी दिली जाते. म्हणून अजित पवार यांना परवानगी दिली गेली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 19, 2009 10:31 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 19, 2009 10:31 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close