S M L

विश्वासदर्शक ठरावं नियमानेच मंजूर -हरिभाऊ बागडे

Sachin Salve | Updated On: Nov 12, 2014 05:18 PM IST

विश्वासदर्शक ठरावं नियमानेच मंजूर -हरिभाऊ बागडे

haribhau_bagade_new12 नोव्हेंबर : ते काय आरोप करताय ते करू द्या, पण विश्वासदर्शक ठराव नियमांनुसारच झाला आहे असं स्पष्टीकरण विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिलं. तसंच काँग्रेसने वेळेवर पोल दिला नाही, यात त्यांचीच चुकी आहे असंही बागडे यांनी सांगितलं.

विधानभवनात कधी नव्हे ती परिस्थिती आज पाहण्यास मिळत आहे. भाजपने विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने जिंकल्यानंतर शिवसेना आणि काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. अध्यक्षांनी नियमबाह्य पद्धतीने काम केलं, अध्यक्ष गांगरुन गेले अशा शब्दात विरोधकांनी आसूड ओढला. मात्र, आवाजी मतदानाचा हे नियमाप्रमाणेच झालं आहे असा खुलासा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केलाय. हरिभाऊ बागडे म्हणतात, "अभिनंदनाचा प्रस्ताव झाल्यानंतर दुसरा विषय होता विरोधीपक्षनेतेच्या मान्यतेचा. खरं म्हणजे सरकारवर विश्वासदर्शक प्रस्ताव हा मान्य झाल्यानंतरचं विरोधी पक्षनेतेपदाच्या मान्यतेचा प्रस्ताव घ्यावा असं ठरलं होतं. पण नोट उशिरा आल्यामुळे विरोधी पक्ष नेत्याच्या निवडीचा प्रस्ताव अगोदर मांडण्यात आला. त्यानंतर सरकारवरचा मुख्यमंत्र्यांवरचा विश्वासदर्शक प्रस्ताव पारित करण्यासाठी मी तो पुकारला आणि आशिष शेलार यांनी तो मांडला. प्रस्ताव मांडून झाल्यानंतर मी त्या संबंधाची अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावं आणि प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावं असं विचारलं. पण हे वाक्य उच्चारताचं पोल मागायला हवा होता, तो त्यांनी मागितला नाही. त्यांनी मागितला नाही ही त्यांची चुकी आहे असा खुलासा बागडेंनी केला. तसंच प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर मी पुढचा विषय पुकारल्यानंतर त्यांनी विश्वासदर्शक ठरावाबाबत पोलची मागणी केली पण विश्वासदर्शक ठराव मंजूर झाला होतो त्यावर पोल घेता येत नाही त्यामुळे सगळं नियमानंच पार पडलं असंही बागडे म्हणाले.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 12, 2014 05:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close