S M L

भाजपला पाठिंब्याच्या मोबदल्यात, NCPला विधानपरिषदेच्या चाव्या?

Sachin Salve | Updated On: Nov 12, 2014 08:52 PM IST

भाजपला पाठिंब्याच्या मोबदल्यात, NCPला विधानपरिषदेच्या चाव्या?

pawar_fadanvis12 नोव्हेंबर : राष्ट्रवादीची आजची भूमिका स्पष्ट न झाल्याने भाजप आणि राष्ट्रवादीत साटंलोटं असल्याचा आरोप आता होत आहे. भाजपला दिलेल्या पाठिंब्याच्या बदल्यात विधानपरिषदेचं सभापतीपद आणि विरोधी पक्ष नेतेपद राष्ट्रवादीला मिळू शकतं. त्यावेळी भाजप आडकाठी घेणार नाही अशी सूत्रांची माहिती आहे.

भाजप सरकारने आज अग्निपरीक्षा पास केली. भाजपने विश्वासदर्शक ठराव जिंकला पण भाजपला कुणाचा पाठिंबा मिळाला हे मात्र अजूनही अधिकृतपणे स्पष्ट झालं नाही. राष्ट्रवादीने अगोदर बिनशर्त पाठिंबा दिला होता. तसंच आज विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी सर्व आमदारांनी सभागृहात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते पण कुणाच्या बाजूने मतदान करायचं हे सांगण्यात आलं नव्हतं. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी विश्वासदर्शक प्रस्ताव सादर केला आणि आवाजी मतदानाने तो मंजूरही झाला. पण भाजपने बहुमताचा 145 चा आकडा कसा पूर्ण केला हे अजूनही अनुत्तरीत आहे. सूत्रांने दिलेल्या माहितीनुसार, भाजपला दिलेल्या पाठिंब्याच्या बदल्यात विधानपरिषदेचं सभापतीपद आणि विरोधी पक्ष नेतेपद राष्ट्रवादीला मिळू शकतं. त्यावेळी भाजप आडकाठी घेणार नाही असं कळतंय. पण राष्ट्रवादीकडून हा आरोप नाकारण्यात येतोय. नियमानुसारच राष्ट्रवादी विधान परिषदेच्या निवडणुकाला सामोरी जाईल, असं सांगण्यात येतंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 12, 2014 08:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close