S M L

अभिनेत्री ममता कुलकर्णी केनियन पोलिसांच्या ताब्यात

Samruddha Bhambure | Updated On: Nov 13, 2014 03:08 PM IST

अभिनेत्री ममता कुलकर्णी केनियन पोलिसांच्या ताब्यात

13  नोव्हेंबर :  बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीला ड्रग्ज तस्करीप्रकरणी केनियन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिच्यासोबत तिचा नवरा विजय गोस्वामी उर्फ विकी गोस्वामीला देखील पोलिसांनी अटक केली आहे.

केनियातील ड्रगविरोधी एजन्सीने ड्रग्जची तस्करी करणार्‍या एक मोठा रॅकेट उघड केले आहे. याप्रकरणी ममता कुलकर्णी, तिचा पती विकी यांच्यासोबत इतर तीन जणांना पोलिसांनी अटक केली असून पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत. विकी गोस्वामीसह इतर तिघांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

करण अर्जुन, क्रांतीवीर, बाजी, आशिक आवारा यासारख्या चित्रपटांमधून अभिनय केलेल्या ममताने बॉलिवूडमध्ये चांगला जम बसविला होता. मात्र अचानकपणे ती बॉलिवूडपासून दूरावली होती.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 13, 2014 02:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close