S M L

सेनेचा सरकारविरोधात पवित्रा म्हणजे बनाव -मलिक

Sachin Salve | Updated On: Nov 13, 2014 05:49 PM IST

99malik13 नोव्हेंबर : शिवसेना सत्तेसाठी फडफडते आहे, त्यामुळे शिवसेनेनं फडणवीस सरकारविरुद्ध जो पवित्रा घेतलाय तो बनाव आहे अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलीये. जर शिवसेनेला खरंच विरोधी पक्षात बसायचं असेल तर त्यांनी केंद्रातल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला हवा असा सल्लावजा टोलाही लगावला. एका प्रकारे मलिक यांनी भाजपची बाजू घेत सेनेवर टीकास्त्र सोडले आहे.

फडणवीस सरकारने बुधवारी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. बहुमतासाठी 145 आकडा गाठण्यासाठी भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला खरा पण हे जनतेसमोर येऊ नये म्हणून आवाजी मतदान घेऊन ठराव जिंकण्यात आला. भाजप आणि राष्ट्रवादीची छुपी युती आता समोर येऊ लागली आहे. सेनेनं भाजपविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते धावून आले आहे. शिवसेना सत्तेसाठी फडफडते आहे, त्यामुळे शिवसेनेनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारविरुद्ध जो पवित्रा घेतलाय तो बनाव आहे. एकीकडे विरोधात बसायचं आणि दुसरीकडे केंद्रात आणि मुंबई पालिकेत युती करायची जर शिवसेनेला खरंच विरोधी पक्षात बसायचं असेल तर त्यांनी केंद्रातल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला हवा असा टोलाही मलिक यांनी लगावला. शिवाय बुधवारी विधानसभेत जे काही झालं ते नियमांना अनुसरुनच होतं, त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेसच्या आरडाओरड्याला काहीच अर्थ नसल्याची टीकाही मलिकांनी केली. तसंच राज्यपालांसोबतच्या काँग्रेसच्या आमदारांची वागणूक योग्य नव्हती. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना आवरायला हवे होते, असंही नवाब मलिक म्हणाले.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 13, 2014 04:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close