S M L

रो'हिट' शर्माने रचला इतिहास, 264 धावांचा केला विश्वविक्रम

Sachin Salve | Updated On: Nov 14, 2014 12:48 PM IST

रो'हिट' शर्माने रचला इतिहास, 264 धावांचा केला विश्वविक्रम

13 नोव्हेंबर : भारतीय टीमचा धडाकेबाज फलंदाज आणि मुंबईकर रोहित शर्माने आज इतिहास रचला आहेत. 264 धावांची झुंजार खेळी करून रोहितने नवा विश्वविक्रम केला आहेत. वन डे करिअरमध्ये 264 धावा करणार रोहित हा एकमेव क्रिकेटर ठरला आहेत. 173 बॉलमध्ये रोहितने 264 रन्स करत 33 फोर, 9 सिक्सचा वर्षाव केला. एवढंच नाहीतर रोहितने विरेंद्र सेहवागचा 219 धावांचा रेकॉर्डही मोडला आहे. रोहितच्या डब्बल सेंच्युरीच्या बळावर भारताने तब्बल 404 धावांचा डोंगर रचला. 404 धावांचा पाठलाग करणार लंकनं टीम 251 धावांवर गारद झाली. भारताने 4-0 अशी विजयी आघाडी घेत मालिका खिश्यात घातली.

तो आला...तो खेळला...आणि त्यांने जिंकलं...असंच काहीस आज रोहित शर्माबद्दल म्हणावे लागणार आहे. दुखापतीतून सावरून रोहित शर्मा आज मैदानावर उतरला आणि आजचा दिवसचा फक्त रोहित शर्माचा ठरला. वन डे सामन्यात आजपर्यंत सर्वाधिक धावा करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड रोहितने केलाय. श्रीलंकेविरोधात कोलकाताच्या ईडन गार्डनवर सुरू असलेल्या चौथ्या वन डे सामन्यात रोहितने आज करिश्मा करून दाखवला. रोहितने 173 बॉलमध्ये 264 रन्स करत 33 फोर, 9 सिक्सची शानदार इनिंग खेळलीये. रोहितने याअगोदर 2 नोव्हेंबर 2013 रोजी ऑस्ट्रेलियाच्या विरोधात 209 रन्स केले होते. त्यावेळी अवघ्या काही रन्सने त्याला वर्ल्ड रेकॉर्डने हुलकावणी दिली होती.

वर्ष भराच्या प्रतिक्षेनंतर रोहितने नोव्हेंबर महिन्यातच डबल धमाका करत द्विशतक झळकावले आहे. या द्विशतक बरोबरच रोहितने विरेंद्र सेहवागचा 219 धावा आणि विक्रमादित्य सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडित काढला. भारताने आज टॉस जिंकून पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. भारतीय फलंदाजांनी श्रीलंकनं बॉलरची दमदार धुलाई केली. रोहितच्या फटकेबाजीपुढे लंकनं बॉलरनी अक्षरश: लोटांगण घेतले. अखेरच्या 10 ओव्हरमध्ये भारताने तब्बल 129 धावा केल्यात. रॉबिन उथप्पाने नाबाद 16 धावा करत पाचव्या विकेटसाठी 128 धावांची भागिदारी केली.

रोहितने या अगोदर कॅप्टन विराट कोहलीच्या 66 रन्सच्या खेळीवर तिसर्‍या विकेटसाठी 155 बॉलमध्ये 202 रन्सची भागिदारी केली. रोहित आणि विराटने भारतीय टीमला चांगली सुरूवातच दिली नाहीतर धावांची गतीही वाढवली. कोहली 64 धावा करत 6 फोर लगावले. त्याअगोदर शिखर धवनच्या जागी आलेल्या अजिंक्य रहाणेने 28 रन्स केले. पण आठव्या ओव्हरमध्ये मैथ्यूजने रहाणेची विकेट घेऊन लंकेला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर अंबाती रायडू 8, सुरेश रैना 11 रन्स करून पव्हेलियनमध्ये परतले पण तरीही रोहितची धडाकेबाज खेळी सुरू होती.

अखेरच्या ओव्हरपर्यंत मैदानावर लढत राहिला आणि 264 धावांची ऐतिहासिक खेळी करून आऊट झाला. रोहितच्या धडाकेबाज खेळीच्या बळावर भारताने 404 धावांचा डोंगर रचला. 404 धावांचा लक्ष्य घेऊन लंकनं टीम मैदानात उतरली खरी पण धावांचा डोंगर पाहुन लंकनं टीम कोसळली. लंकनं टीम 251 धावांवर मजल मारू शकली. भारताकडून धवल कुलकणीर्ंने सर्वाधिक 4 विकेट घेतल्यात. या विजयासह भारताने 4-0 ने मालिका जिंकली आणि रोहितने जग जिंकले.

रोहितचा डबल धमाका

रन्स - 264

बॉल्स -173

फोर - 33

सिक्स- 9

स्ट्राईक रेट -152.60

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोहित शर्माचं ट्विटरवरून अभिनंदन केलंय. मुख्यमंत्री म्हणतात, "वन-डे क्रिकेटमध्ये 264चा नवा रेकॉर्ड केल्याबद्दल अभिनंदन! महाराष्ट्राला तुझा अभिमान आहे."

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 13, 2014 09:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close