S M L

लालगडमध्ये माओवाद्यांना प्रतिकार करण्यात यश

20 जून, लालगड सौगाता मुखोपाध्यायलालगडमध्ये अखेर संथगतीने का होईना, सुरक्षारक्षकांनी आणि पोलिसांनी माओवाद्यांविरोधात कारवाईला सुरुवात केली आहे. आदिवासींच्या मदतीने माओवाद्यांचा प्रतिकार मोडून काढण्यात सुरक्षारक्षकांनाही काही प्रमाणात यश आलं आहे. पण माओवाद्यांपेक्षाही या सुरक्षारक्षकांना राजकीय पक्षांचं आणि स्थानिक आदिवासींचं कडवं आव्हान वाटत आहे. माओवाद्यांच्या विरोधात कारवाईसाठी विशेष प्रशिक्षण दिलेल्या कोब्रा फोर्सने, माओवाद्यांनी पेरून ठेवलेले भूसुरुंग नष्ट केले. आणि सुरक्षारक्षकांना लालगडच्या दिशेने पुढे जाण्याची वाट मोकळी करून दिली असल्याची माहिती प. बंगालचे गृहसचिव अर्धेंदू सेन यांनी दिली. लालगड परिसरात पोलिसांची आगेकूच सुरू आहे. त्यातच माओवाद्यांच्या अनेक म्होरक्यांनी झारखंडला पलायन केल्याची माहिती पुढे आली आहे. त्यात कोटेश्वर रावचाही समावेश आहे. मात्र, माओवाद्यांना तृणमूलकडून पाठबळ दिलं जात असल्याचा आरोप प. बंगालमधले सीपीएमचे नेते बिमन बोस यांनी केला आहे. दरम्यान, माओवाद्यांचा बिमोड करण्यासाठी आवश्यक ती मदत देण्याचं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी दिलं आहे. लालगड परिसरात संथ गतीने आगेकूच करणार्‍या सुरक्षारक्षकांना कमीत कमी प्राणहानीचं अवघड आव्हान पेलायच आहे.मात्र, स्थानिक आदिवासींचा माओवाद्यांना असणारा पाठिंबा आणि मदत बघता, पोलिसांना प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागतआहे. त्यातच राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या रंगणार्‍या फैरी बघता, लालगड माओवाद्यांच्या तावडीतून सोडवणं, हे सुरक्षा रक्षकांसाठी मोठं आव्हान ठरणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 20, 2009 05:59 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 20, 2009 05:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close