S M L

मुंबईतल्या युतीबाबत लवकरच 'मास्टरस्ट्रोक' लगावणार - राऊत

Sachin Salve | Updated On: Nov 13, 2014 07:07 PM IST

sanjay_raut13 नोव्हेंबर :  मुंबई आणि ठाणे महापालिकेतल्या युतीबाबत शिवसेना लवकरच मास्टरस्ट्रोक लगावणार आहे अशी माहिती सेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिलीय.

याबाबत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. फडणवीस सरकारला मिळालेलं बहुमत नाही तर विश्वासघात आहे, असा आरोपही संजय राऊत यांनी केलाय. काँग्रेस राष्ट्रवादीला टीका करणार्‍यांनी काल तोच प्रकार केल्याचं त्यांनी म्हटलंय.

देवेंद्र फडणवीस सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकला आणि शिवेसना विरोधी बाकावर बसली. राज्यात युती फिस्कटल्यानंतर आता मुंबई आणि ठाणे महापालिकेतल्या युतीचं काय होणार हा प्रश्न सर्वांना पडलाय. त्याबद्दल आता संजय राऊत यांनी सुचक विधान केलंय. त्यामुळे उद्धव ठाकरे आता काय निर्णय घेता याकडे सगळ्याचं लक्ष लागलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 13, 2014 06:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close