S M L

विश्वासदर्शक ठरावासाठी पुन्हा अधिवेशन बोलवा-शिंदे

Sachin Salve | Updated On: Nov 13, 2014 10:54 PM IST

विश्वासदर्शक ठरावासाठी पुन्हा अधिवेशन बोलवा-शिंदे

shinde meet rao13 नोव्हेंबर : विश्वासदर्शक ठरावासाठी पुन्हा एकदा विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे केलीय. तसंच विधिमंडळात भाजप सरकारनं आवाजी मतदान करुन बहुमत ठराव पास करुन घेतला ही प्रक्रिया बेकायदेशीर असून या सगळ्या प्रकरणाची चौकशी करुन कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केलीय. राज्यपालांनी ही यावर चौकशीचं आश्वासनं दिलंय.

विधीमंडळाचे विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या आमदारांचे शिष्टमंडळाने आज (गुरुवारी) राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेतली . या भेटीमध्ये शिवसेनेनं राज्यपालांना निवेदन दिलंय. यावेळी आमदार दिवाकर रावते ,नीलम गोर्‍हे ,आमदार प्रकाश सावंत, रवींद्र वायकर, राजन साळवी ,अनिल परब, सुनील राऊत सोबत होते. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केलाय. ज्यांना सरकारचा विश्वासदर्शक ठराव बेकायदेशीर वाटतो त्यांनी अविश्वास ठराव आणावा असं त्यांनी पुन्हा आव्हान दिलं. दरम्यान, राज्यात युती फिस्कटल्यानंतर आता मुंबई आणि ठाणे महापालिकेतल्या युतीचं काय होणार हा प्रश्न सर्वांना पडलाय. मुंबई आणि ठाणे महापालिकेतल्या युतीबाबत शिवसेना लवकरच मास्टरस्ट्रोक लगावणार आहे, अशी माहिती सेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिलीय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 13, 2014 10:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close