S M L

मराठा आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात दाद मागणार -मुख्यमंत्री

Sachin Salve | Updated On: Nov 14, 2014 05:37 PM IST

Dev fadnavis14 नोव्हेंबर : आमचं सरकार हे मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे. कुठल्याही स्थितीत आरक्षण कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करणार, गरज पडल्यास सुप्रीम कोर्टातही जाऊ असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय. तसंच जर आरक्षणात काही कायदेशीर त्रुटी असेल तर हिवाळी अधिवेशनात त्या दूर करणार पण आरक्षण टीकेल अशा उपाययोजना करू अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

आज शुक्रवारी मुंबई हायकोर्टाने मराठा आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती दिलीये. तीन वेगवेगळ्या याचिकांवर मुंबई हायकोर्टाने हा निर्णय दिलाय. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर 16% मराठा आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. आता नव्याने स्थापन झालेल्या सरकारने मात्र यावर सावध बाजू मांडलीये.

तर भाजप सरकारने आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करावी असा मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलीये. तर आरक्षण कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आश्वासन दिलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 14, 2014 05:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close