S M L

मराठा आरक्षणाला स्थगितीचे पडसाद, पंढरपुरात तोडफोड

Sachin Salve | Updated On: Nov 14, 2014 07:23 PM IST

मराठा आरक्षणाला स्थगितीचे पडसाद, पंढरपुरात तोडफोड

pandharpur14 नोव्हेंबर : मराठा आरक्षणाला मुंबई हायकोर्टाने स्थगिती दिल्यानंतर पंढरपुरात त्याचे पडसाद उमटले. वेगवेगळ्या मराठा संघटनांनी सरकारचा निषेध करत तहसील कार्यालयाची तोडफोड केली.

राज्य शासनाने न्यायालयात मराठा समाजाची बाजू व्यवस्थितपणे न मांडल्याने न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. तोडफोड करण्यापूर्वी या पदाधिकार्‍यांनी तहसीलदार धनाजी गुरव यांना शासनाचे निषेध करणारे निवेदन दिलंय.

त्यानंतर या जमावातील काही कार्यकर्त्यांनी नायब तहसीलदार यांच्या केबिनच्या काचेवर दगड मारून कार्यालयाची नासधूस केली. घटनेनंतर पोलिसांनी पाहणी करून संबंधिताना कार्यालयाबाहेर काढले आणि ताब्यात घेतलं. या आंदोलनात संभाजी ब्रिगेड, छावा संघटना, मराठा महासंघ, शंभू सेना अशा मराठा संघटनाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 14, 2014 07:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close