S M L

आरक्षणासाठी सरकार सुप्रीम कोर्टात गेले नाहीतर आम्ही जाऊ-राणे

Sachin Salve | Updated On: Nov 14, 2014 08:19 PM IST

naryan rane3नव्या सरकारने कोर्टात योग्य बाजू मांडली नाही -राणे

14 नोव्हेंबर : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारकडून सरकारी वकिलाने योग्य बाजू मांडली नाही त्यामुळे मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली असा गंभीर आरोप मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी केला. तसंच नवं सरकार सुप्रीम कोर्टात गेलं नाही, तर काँग्रेस कोर्टात जाईल असा इशाराही राणे यांनी दिला. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्धार व्यक्त केला.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आघाडी सरकारने मराठा समाजाला 16 टक्के आणि मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. कायद्याच्या चौकटीत मराठा आरक्षण बसणार नाही अशी शक्यता असतांनाही सरकारने आरक्षणाची घोषणा केली. या घोषणेनंतर सामजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. आज कोर्टाने मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास नाही. त्यामुळे त्यांना घटनेनुसार 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही, असं स्पष्ट केलं. विशेष म्हणजे योगायोगाने दोनच दिवसांपूर्वी बहुमताची परीक्षापासून करुन सत्तेवर विराजमान झालेल्या भाजप सरकारला यामुळे मात्र पुन्हा टीकेचे धनी व्हावे लागले. काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या अपयशाचं खापरं फडणवीस सरकारवर फोडलं. आमचे सरकार असतांना जेव्हा कोर्टात सुनावणी झाली होती तेव्हा कोर्टाने स्थगिती दिली नाही. पण आज नव्या सरकारने वकिलांकडून नीट बाजू मांडून घेतली नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली. माझ्या समितीने घेतलेला निर्णय हा कायदे डोळ्यासमोर ठेवून घेतला होता. कॅव्हीटही दाखल केले होते असंही राणे म्हणाले. जर राज्य सरकार सुप्रीम कोर्टात गेले नाही तर काँग्रेस सुप्रीम कोर्टात जाईल असा इशाराही राणेंनी दिला.

राष्ट्रवादी दगाफटका करेल भाजप सरकार पडेल -राणे

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला हे मला पटलेले नाही.राष्ट्रवादीची भूमिका म्हणजे ना घर ना घाटका अशीच आहे. राष्ट्रवादी अजूनही तडजोड करतेय. त्यामुळे त्यांनी पाठिंब्याचे पत्रही दिलेले नाही. त्यामुळे हे सरकार अजूनही स्थिर नाही. हे सरकार कधीही जाऊ शकते. कारण राष्ट्रवादी दगा फटका करेल अशी शक्यता आहे या अगोदरही असे घडले आहे असंही राणे म्हणाले.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 14, 2014 08:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close