S M L

अमित शहा आणि सेनेचे खासदार चंद्रकांत खैरे एकाच व्यासपीठावर

Sachin Salve | Updated On: Nov 14, 2014 10:36 PM IST

अमित शहा आणि सेनेचे खासदार चंद्रकांत खैरे एकाच व्यासपीठावर

amit shah khaire414 नोव्हेंबर : औरंगाबाद इथं पैठणमध्ये आज संत एकनाथ साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा अमित शहांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आलाय.

आश्चर्य म्हणजे या कार्यक्रमात व्यासपीठावर भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे आणि पैठणचे शिवसेनेचे आमदार संदीपान भुमरेसुद्धा उपस्थित होते.

त्यातही आमदार भुमरे यांनी अमित शहा यांचा सत्कार केला. सत्तेत सहभागाच्या मुद्द्यावरून सध्या भाजप आणि शिवसेनेमध्ये वातावरण चांगलंच तापलंय. अशात भाजप आणि शिवसेनेचे हे बडे नेते एकाच व्यासपीठावर आल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येतंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 14, 2014 10:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close