S M L

पंतप्रधान मोदी 'जी-20' समिटमध्ये होणार सहभागी

Sachin Salve | Updated On: Nov 14, 2014 11:55 PM IST

पंतप्रधान मोदी 'जी-20' समिटमध्ये होणार सहभागी

pm3452315 नोव्हेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी म्यानमार दौर्‍यानंतर आता ऑस्ट्रेलिया दौर्‍याला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान ऑस्ट्रेलियामध्ये आज आणि उद्या रविवारी होणार्‍या जी 20 परिषदेत सहभागी होणार आहे.

शुक्रवारी पंतप्रधान मोदी ऑस्ट्रेलियात पोहचले. जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांनी ऑस्ट्रेलियातल्या ब्रिस्बेनमध्ये मोदींसाठी मेजवानी ठेवली आहे, मोदींनी आज ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हीड कॅमेरून यांची भेट घेतली. क्वीन्सलँड युनिव्हिसिर्टीमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांशीही संवाद साधला.

त्याअगोदर ऑस्ट्रेलियात पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पहिला कार्यक्रम होता तो क्वीन्सलँड विद्यापीठाच्या भेटीचा.पंतप्रधानांनी या विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवादही साधला. विद्यापीठात पाहणी करताना त्यांनी गुजरातीमधून कविता लिहिली आणि शुभेच्छाही दिल्या. त्यानंतर आता ते ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांची भेट घेतील.तर रात्री जपानी पंतप्रधान शिंझो आबे यांनी आजोयित केलेल्या स्नेहभोजनाला ते उपस्थित होते.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 15, 2014 09:01 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close