S M L

जी 20 परिषदेत मोदींनी उपस्थित केला काळ्या पैशाचा मुद्दा

Sachin Salve | Updated On: Nov 15, 2014 02:48 PM IST

जी 20 परिषदेत मोदींनी उपस्थित केला काळ्या पैशाचा मुद्दा

brics_modi3315 नोव्हेंबर : ब्रिस्बेनमध्ये जी 20 परिषदेला आजपासून सुरूवात झाली आहे. जी 20 देशातील सर्व राष्ट्रप्रमुखांच्या उपस्थित या परिषदेचा श्रीगणेशा झाला. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशाचा आणि दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. काळा पैशांच्या मुद्यावर सर्व राष्ट्रांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा मोदींनी व्यक्त केली.

ब्रिस्बेनमध्ये आज सकाळी भारतीय वेळेनुसार सकाळी 9.45 वाजता या जी 20 च्या परिषदेला सुरुवात झाली. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी ऍबट यांनी सगळ्या जागतिक नेत्यांचं या परिषदेसाठी स्वागत केलंय. या परिषदेआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फ्रान्सचं अध्यक्ष फ्रँकॉईज हॉलंड यांची भेट घेतली. आर्थिक सहकार्यासाठी उत्सुक असल्याचं या दोन्ही नेत्यांनी म्हटलंय. दहशतवादाचा मुद्दाही पंतप्रधानांनी हॉलंड यांच्याशी बोलताना मांडला. आर्थिक सुधारणांचा मुद्दा मोदींनी जी 20 परिषदेमध्ये उपस्थित केलाय. परिषदेपूर्वी ब्रिक्स (BRICS) देशांच्या नेत्यांच्या एका अनौपचारिक बैठकीत पंतप्रधान सहभागी झाले होते. काळया पैशाचा मुद्दा पंतप्रधानांनी या चर्चेदरम्यान उपस्थित केला. भारताबाहेर असणारा हा काळा पैसा भारतासाठी महत्त्वाचा मुद्दा असून सुरक्षेच्या दृष्टीनेही ही बाब धोक्याची असल्याचं मोदींनी म्हटलंय. ब्रिक्स देशांच्या या बैठकीत पंतप्रधानांसोबत केंद्रीय मंत्री सुरेश प्रभूही शामील झाले होते. सेनेला रामराम ठोकून प्रभू भाजपमध्ये दाखल झाले. पंतप्रधानांनी खास ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यासाठी प्रभू यांची खास दूत म्हणून नियुक्ती केली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 15, 2014 02:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close