S M L

सेना- भाजपच्या युतीसाठी संघ मध्यस्थी करण्याचे संकेत

Samruddha Bhambure | Updated On: Nov 16, 2014 02:19 PM IST

सेना- भाजपच्या युतीसाठी संघ मध्यस्थी करण्याचे संकेत

16 नोव्हेंबर : भाजपने शिवसेनेसोबत पुन्हा युती करण्यासाठी सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुढाकार घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सत्ता स्थापनेत शिवसेनेसोबतची चर्चा फिसकटल्यावर भाजपने आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव जिंकला असला तरी राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सरकार चालवण्यास संघातून तसंच भाजपमध्यूनही मोठी प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठ्या मनाने पुन्हा सोबत घ्यावं, यासाठी भाजपवर दबाव वाढू लागला आहे. राज्यात भाजप आणि शिवसेना एकत्र यावी, यासाठी खुद्द सरसंघचालक मोहन भागवत प्रयत्नशील असल्याचं कळतं. तर दुसरीकडे शिवसेनेतील अनेक आमदारही सत्तेत सहभागी होण्यासाठी तयार आहेत.  याच पार्श्वभूमीवर सरसंघचालक मोहन भागवत यांनी शिवसेना - भाजपमध्ये पुन्हा युती व्हावी यासाठी प्रयत्न सुरु केल्याचे समजते. यासंदर्भात उद्धव ठाकरे आणि भागवत यांच्यामध्ये फोनवर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यातल्या राजकीय स्थितीवर त्यांच्यात यावेळी चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे.

राष्ट्रवादीने आपल्याशिवाय भाजपला पर्याय नसल्याचं वातावरण निर्माण केल्याने पक्षात मोठी नाराजी आहे. त्यामुळे  भाजप - शिवसेनेमध्ये पुन्हा युती होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सरसंघचालकांची मध्यस्थी कितपत यशस्वी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 16, 2014 12:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close