S M L

चायना ओपन सुपर सीरिजमध्ये भारताचा डबल धमाका!

Samruddha Bhambure | Updated On: Nov 16, 2014 08:27 PM IST

चायना ओपन सुपर सीरिजमध्ये भारताचा डबल धमाका!

16  नोव्हेंबर : चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेतमध्ये भारतासाठी आजचा संडे 'सुपर संडे' ठरला आहे. चीन ओपन सुपर सीरिज प्रीमियर बॅडमिंटन स्पर्धेच्या विजेतेपदावर सायनाने आपलं नाव कोरलं आहे. तर सायनाच्या पाठोपाठ ऑलिम्पिक चॅम्पियन लिन डॅनचा पराभव करत पुरुष एकेरीत स्पर्धेत भारताच्या के. श्रीकांतनेही विजेतेपेद पटकावलं आहे.

सायनाने फायनल राऊंडमध्ये जपानच्या अकेन यामागुचीचा 21-12, 22-20 असा पराभव करत पहिल्यांदाच सुपर सीरिज प्रीमियर बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावलं आहे. सायनाने फायनल राऊंड फक्त 42 मिनिटांत जिंकली आहे.  तर  श्रीकांतने हा सामना २१-१९, २१-१७ असा खिशात घातला. श्रीकांतने कारकीर्दीतील हे पहिलेच सुपर सीरीज जेतेपद आहे.

चायना ओपन जिंकणारी सायना ही पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. चायना ओपनसह सायनानं वर्षातलं दुसरं सुपर सीरिज जेतेपद मिळवलं आहे. याआधी सायनानं मे महिन्यात ऑस्ट्रेलियन सुपर सीरिजचं जेतेपद मिळवलं होतं. सायनानं वर्षाच्या सुरुवातीला सय्यद मोदी इंडियन ओपन ग्रां-प्री जिंकण्याचाही पराक्रम गाजवला होता.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 16, 2014 07:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close