S M L

समीर देसाई यांचा भाजपमध्ये प्रवेश!

Samruddha Bhambure | Updated On: Nov 16, 2014 07:22 PM IST

समीर देसाई यांचा भाजपमध्ये प्रवेश!

IMG-20141116-WA000416 नोव्हेंबर : काँग्रेसचे माजी खासदार गुरूदास कामत यांचे भाचे समीर देसाई यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये दारूण पराभव झाल्यानंतर काँग्रेस पक्षातून अनेकजण काढता पाय घेताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये भाजप आमदार आशिष शेलार यांच्या उपस्थितीत समीर देसाईंनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला.

मुंबई महानगरपालिकेतील राजकीय समीकरणांचा विचार करता, देसाई यांचा भाजप प्रवेश काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे पक्ष प्रवेशानंतर भाजपने समीर देसाईंची मुंबईच्या सचिवपदी नियुक्ती केली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 16, 2014 11:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close