S M L

श्रीलंकेवर भारताचा 'विराट' विजय

Samruddha Bhambure | Updated On: Nov 17, 2014 12:50 PM IST

श्रीलंकेवर भारताचा 'विराट' विजय

17   नोव्हेंबर : कॅप्टन मेहेंद्रसिंग धोणीचा वारसदार असल्याचं सिद्ध करत कॅप्टन विराट कोहलीने श्रीलंकेवर 'क्लीन स्वीप' मिळवला आहे. रांचीमधल्या JSCA मैदानावर श्रीलंकेविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या वन-डेमध्ये श्रीलंकेवर 3 विकेट्सनं मात करत भारतानं ही वन-डे सीरिजच 5-0नं खिशात घातली आहे.

भारताच्या या विजयाचा शिल्पकार ठरला तो कर्णधार विराट कोहली. महेंद्रसिंग धोणीच्या अनुपस्थितीत कॅप्टनशीपची धुरा सांभाळणार्‍या विराटनं या मॅचमध्ये नाबाद शतक ठोकून भारताच्या विजयाचा पाया तर घातलाच, पण एक खिंड लावून धरत टीम इंडियाच्या विजयाचा कळसही चढवला. कोहलीला प्रामुख्यानं साथ दिली ती अक्षर पटेल आणि अंबाती रायडू यांनी. शेवटच्या मॅचमध्ये श्रीलंकेने भारतासमोर 286 रन्सचं लक्ष्य ठेवलं होतं. भारताने 7 विकेट्स गमावत 49व्या ओव्हरमध्येच मॅच जिंकली. रांचीच्या पाचव्या वन डेतही विराट कोहलीनं कॅप्टनशीपला शोभेल असे नाबाद 139 रन्स करत आपल्या वन डे कारकीर्दीतलं 21 वं शतक पूर्ण केलं. कोहली आणि अक्षर पटेलनं आठव्या विकेटसाठी अभेद्य भागीदारी रचली आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. या सीरिजबरोबरच वन-डे रॅकिंगमध्ये भारताचं पहिलं स्थान अधिक बळकट झालं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 17, 2014 09:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close