S M L

आत्मक्लेशाची वेळ आणणार्‍यांनी शिवसेनेकडे आशेने बघू नये - उद्धव ठाकरे

Samruddha Bhambure | Updated On: Nov 17, 2014 01:23 PM IST

uddhav_on_ncp

17   नोव्हेंबर : ज्यांनी महाराष्ट्रावर आत्मक्लेशाची वेळ आणली, त्यांनी यापुढे शिवसेनेकडे आशेने पाहू नये," असा इशारा आज सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला दिला आहे. बाळासाहेबांची शिवसेना आजही तशीच असून हत्तीच्या वेगाने पण वाघाप्रमाणे लढा देत पुढे जात राहील असे ठाकरेंनी म्हटले आहे. त्यामुळे सेना-भाजपच्या मनोमिलनाची चर्चा आता शिवसेनाच थांबवू पाहत आहे की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे.

शिवसेना आणि भाजपमधील दुरावा दूर करण्यासाठी संघाचे प्रयत्न सुरू असल्याची बातमी ताजी असतानाच आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या द्वितीय स्मृतिदिनी सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले आहे.

महाराष्ट्राच्या अखंडतेवर चोचा मारणारी अनेक गिधाडे फांद्याफांद्यांवर बसली आहेत व त्यांच्यापैकी काही जण सत्तेच्या गाद्यांवर बसून मुंबईचे महत्त्व कमी करण्याचे स्वप्न पाहताना दिसत आहेत. शिवसेनेची गरज अशा वेळी महत्त्वाची आहे. विधानसभा निवडणुकीत व त्यानंतर जे घडले त्यावर चिंतन आणि मंथन करण्याची आम्हास गरज नाही, पण आत्मक्लेशाची वेळ ज्यांनी महाराष्ट्रावर आणली त्यांनी यापुढे शिवसेनेकडे आशेने पाहू नये, अशी टीका त्यांनी केली आहे. भाजपने शिवसेनेसाठी सत्तेचे दार उघडे असल्याचे विधान केले असतानाच उद्धव ठाकरेंनी मात्र भाजपसोबत जाणार नसल्याचे संकेत दिले आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 17, 2014 10:12 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close