S M L

इंजिनिअरिंगचे पेपर फुटले, व्हॉट्स ऍपवरून झाले शेअर

Sachin Salve | Updated On: Nov 17, 2014 05:01 PM IST

इंजिनिअरिंगचे पेपर फुटले, व्हॉट्स ऍपवरून झाले शेअर

whatsaap17 नोव्हेंबर : व्हॉट्स ऍपमुळे काय होऊ शकतं आणि काय होऊ शकत नाही याचं धक्कादायक उदाहरण पाहण्यास मिळालंय. नाशिकमध्ये इंजिनिअरिंगचा पेपर सुरू व्हायच्या 14 मिनिटं आधी पेपर फुटले आणि हे पेपर व्हॉट्स ऍपवर वरून मिळाल्याची घटना घडलीये. आयबीएन लोकमतने या घटनेचा पर्दाफाश केलाय.

12 नोव्हेंबरला पुणे विद्यापिठाच्या सिव्हील इंजिनिअरिंगच्या तिसर्‍या वर्षाच्या च्या विद्यार्थ्यांचा स्ट्रेंथ ऑफ मटेरिअल या विषयाचा पेपर होता. पेपरची वेळ होती सकाळी 10 वाजेची पण त्याआधीच म्हणजे 9 वाजून 46 मिनिटांनी या विषयाची प्रश्नपत्रिका व्हॉट्सअपमार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली. व्हॉट्सअपची ही इमेज व प्रश्नपत्रिका सारखीच आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. इंजिअरिंगचे पेपर्स व्हॉट्स अपच्या माध्यमातून फुटत असल्याची बातमी आयबीएन-लोकमतनं दाखवली. मात्र आता व्हॉट्स ऍप वरची इमेज आणि प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका जुळत नसल्याचा दावा पुणे विद्यापिठातर्फे केला जातोय. पुणे विद्यापीठ या समस्येवर पांघरूण घालण्याचंच काम करत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 17, 2014 05:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close