S M L

सिडनीत पंतप्रधान मोदींचा जयघोष !

Sachin Salve | Updated On: Nov 17, 2014 07:02 PM IST

सिडनीत पंतप्रधान मोदींचा जयघोष !

ModiInAustralia17 नोव्हेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदींची जादू आज सिडनीतही पाहण्यास मिळाला. सिडनीतील ऑल्फोन्स अरीनामध्ये झालेल्या भाषणात मोदी...मोदी...एकच जयघोष ऐकायला मिळाला. तासभराहुनही अधिक चाललेल्या भाषणात मोदींनी सिडनीकरांची आणि भारतीय वंशाच्या नागरिकांची मनं जिंकले.

ते आले त्यांनी पाहिलं आणि त्यांनी जिंकलं...असंच आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाबतीत झालं. सिडनी दौर्‍यावर असलेले पंतप्रधान मोदींचं आज सिडनीतील ऑल्फोन्स अरीनामध्ये शानदार स्वागत झालं. ऑल्फोन्स अरीनामध्ये तब्बल 16 हजार भारतीय वंशाच्या नागरिकांशी संवाद साधला. लोकांचा उत्साह पाहून हा सन्मान माझा नसून सव्वा कोटी भारतीयांचा आहे. हा सन्मान आणि तुमचं प्रेम भारत मातेच्या सव्वा कोटी संतांच्या चरणी अर्पण करतो असे गौरद्गारही मोदींनी काढले. यावेळी मोदींनी स्वामी विवेकानंद यांची आठवणही काढली. आपण कल्पना नाही करू शकत आपले महापुरुष किती दुरदृष्टीचे होते. मी स्वता:ला भाग्यशाली समजतो की मी, असा पंतप्रधान आहे जो स्वतंत्र्य भारतात माझा जन्म झाला आणि मला माझ्या जबाबदारीच्या पूर्ण जाणीव आहे. आम्हाला देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्याचं सौभाग्य लाभलं नाही. फाशीवर चढण्याचे आणि जेलमध्ये जाण्याचे सौभाग्य मिळाले नाही. आपल्यामध्ये देशाबद्दल इतक प्रेम पाहिजे की, देशासाठी आपण मरू तर शकलो नाही, पण देशासाठी जगू तर शकतो असंही मोदी म्हणाले. आज काही तासांत ऑस्ट्रेलियात पोहचता येते पण भारताच्या पंतप्रधानाला इथं येण्यासाठी 28 वर्ष लागली. इथं राहणार्‍या भारतीयांना आता 28 वर्ष वाट पाहावी लागणार नाही. जितका हक्क भारतीयांना आहे तितकाच हक्क इथं राहणार्‍या भारतीयांना आहे. जे भारतीय नागरिक सध्या ऑस्ट्रेलियात राहतात, त्यांच्या समस्या सोडवण्याचं आश्वासन आणि ऑस्ट्रेलियन पर्यटकांना भारतात आल्यावर व्हिसा ऑन अरायव्हल मिळेल, अशी घोषणा यावेळी मोदींनी केली. जेव्हा नवीन सरकारने बनते तेव्हा नवीन कायदे अस्थित्वात आणली जाते. पण मी जेव्हा येतो तेव्हा कायदे तोडतो. त्यांना कायदे तयार करण्यात मजा येते मला कायदे तोडण्यात मजा येते असं वक्तव्यही मोदींनी केलं. तसंच ऑस्ट्रेलियातल्या भारतीय वंशाच्या नागरिकांनी भारतातल्या गावांमध्ये होणार्‍या विकासकामासाठी निधी पाठवाव, असं आवाहन मोदींनी आपल्या भाषणात केलं.

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 17, 2014 06:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close