S M L

शरद पवारांनी दिले मध्यावधी निवडणुकीचे संकेत

Samruddha Bhambure | Updated On: Nov 18, 2014 04:57 PM IST

sharad_pawar_on_sena

18 नोव्हेंबर : सध्याची राजकीय स्थिती पाहाता राज्यात कधीही मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता असल्याचं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी आपल्या कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. भाजप सरकार टिकवण्याचा राष्ट्रवादीने मक्ता घेतला नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने अलिबाग इथे आज (मंगळावारी) दोन दिवसांच्या चिंतन शिबीराचे आयोजन केले आहे. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी राष्ट्रवादीचे आमदार तटस्थ राहिल्याचा दावाही पवारांनी केला. भाजप आणि शिवसेना युती झाली असती तर पुढील पाच वर्ष एकत्र आले तर सरकार स्थिर झाले असते. पण तसे झाले नाही. काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र येऊनही सरकार स्थापन झाले नसते. म्हणून भाजपला पाठिंबा दिला. पण ही स्थिती दिर्घकालीन स्थिरता देणारी नाही आणि जर स्थिती बिघडली तर पुन्हा निवडणुकांना सामोरं जावं लागेल, असं शरद पवार म्हणाले आहेत. त्याच बरोबर विधानसभा निवडणुकीद्वारे महाराष्ट्रात पाय रोवणार्‍या एमआयएमला भाजपमधील काही जणांनी पाठिंबा दिल्याचा आरोपही त्यांनी केला. या पक्षाच्या नेत्यांची प्रक्षोभक भाषणे पाहता राज्यातील एकोप्याला धोका निर्माण झाल्याचे पवारांनी सांगितले.

यावेळी शरद पवार यांनी उपस्थित पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन केले. काँग्रेस, भाजप, शिवसेना या सर्व पक्षांनी राष्ट्रवादीला लक्ष्य केलं. काँग्रेसने राष्ट्रवादीचे नेते भ्रष्टाचारात गुंतल्याचे चित्र निर्माण केले आणि विरोधकांनी त्याचा फायदा घेतला असल्याचं ही त्यांनी सांगितलं. तसचं राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क वाढवण्यात अपयशी ठरली असून आपण नेमके कुठे कमी पडलो हे देखील तपासून बघायला हवे असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. राष्ट्रवादीपासून दुरावलेल्या घटकांचा पुन्हा विश्वास संपादन करण्याची गरज असल्याचेही पवारांनी म्हटले आहे.


Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 18, 2014 11:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close