S M L

अर्धा महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत,मुख्यमंत्र्यांनी दिली कबुली

Sachin Salve | Updated On: Nov 18, 2014 05:51 PM IST

devendra fadnvis4418 नोव्हेंबर : राज्यावर दुष्काळाची परिस्थिती आहे अशी स्पोष्टकती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दुष्काळ हे राज्यावरचं संकट असल्याचं म्हणत दुष्काळग्रस्तांना मदत देण्याच्या दृष्टीनं काही महत्त्वाचे निर्णय घेतले असून यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. तसंच याबाबत केंद्राकडे अहवाल पाठवणार असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

आज राज्यमंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन बैठकीचे निर्णय सांगितलं.मुख्यमंत्र्यांनी राज्यात दुष्काळाची परिस्थ्ती असल्याची ग्वाही दिली. राज्यातील 39 हजार 134 गावापैकी 19 हजार 69 गावातील 2014-15 या वर्षातील खरीप पिकांची हंगामी पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी आली आहे. या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत देण्यासाठी एका आठवड्यात केंद्र सरकारकडे मदतीसाठी तपशीलवार प्रतिवेदन (मेमोरँडम) पाठविण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. 50 टक्क्यांपेक्षा कमी आणेवारी असलेल्या गावांना यातून मदत मिळेल, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. तसंच दुष्काळप्रश्नावर उपाययोजना करण्यासाठी एक समितीही स्थापन्याचा निर्णय झालाय. या समितीत अर्थमंत्री, महसूलमंत्री, ग्रामविकास मंत्री आणि मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांचा समावेश असेल.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 18, 2014 05:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close