S M L

सेनेसाठी चर्चेची दारं खुली, मुख्यमंत्र्यांकडून सेनेला पुन्हा निमंत्रण

Sachin Salve | Updated On: Nov 18, 2014 07:42 PM IST

fadanvis_udhav_thackarey18 नोव्हेंबर : राज्यातलं भाजप सरकार स्थिर आहे आणि मध्यावधी निवडणुका होणार नाहीत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर शिवसेनेसाठी चर्चेची दारं खुली असल्याचंही फडणवीस यांनी स्पष्ट करून सेनेला सत्तेत सहभागाच पुन्हा निमंत्रण दिलंय.

भाजपने विश्वासदर्शक ठराव जिंकला खरा पण राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतल्यामुळे भाजपला टीकेला सामोरं जावं लागलं. पण अजूनही भाजपला आणि शिवसेनेला एकत्र येण्याची आस आहे. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. आजही शिवसेनेसाठी चर्चेचे दार खुले आहे. आमची सेनेसोबत चर्चा सुरू आहे. त्यातून योग्य तो मार्ग निघेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. याचा निर्णयही लवकरच काय तो कळेल असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. शरद पवार यांनी मध्यावधी निवडणुकीची शक्यता वर्तवल्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. आमचं सरकार स्थिर आहे, अस्थिर नाही. निर्णय घेण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे मध्यावधी निवडणुकांची शक्यता नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. तसंच जनतेनं मोठ्या अपेक्षेनं आम्हाला निवडून दिलंय. आज कुणालाही मध्यावधी निवडणुकी नको आहे. आमचं सरकार सर्व अपेक्षा पूर्ण करेल आणि 5 वर्ष काम करेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 18, 2014 07:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close