S M L

नववी आणि अकरावीच्या लेखी परीक्षेत 20 गूण आवश्यक

Sachin Salve | Updated On: Nov 19, 2014 06:32 PM IST

नववी आणि अकरावीच्या लेखी परीक्षेत 20 गूण आवश्यक

exam_9th_11th19 नोव्हेंबर : दहावी आणि बारावीची परीक्षा म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात आव्हानात्मक आणि वेगळं वळणं असतं. पण आता हे आव्हान तुम्हाला पेलायचं असेल तर अगोदर नववी आणि अकरावीची परीक्षा सोडावी लागणार आहे.

दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसण्यासाठी आता नववी आणि अकरावीमध्ये लेखी परीक्षेत प्रत्येक पेपरमध्ये किमान वीस मार्क असणं आवश्यक ठरणार आहे. येत्या 2015 - 16 या शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी होणार आहे.

बोर्डाचे अध्यक्ष गंगाधर मम्हाणे यांनी ही माहिती दिलीय. यापूर्वी लेखी आणि तोंडी हे मार्क एकत्र करुन 35 मार्कांना पासिंग होतं.मात्र आता लेखी परिक्षेमध्येही किमान 20 मार्क मिळवणं बंधनकारक ठरणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 19, 2014 06:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close