S M L

वीजेची तार पडून 40 एकर ऊस जळून खाक

Sachin Salve | Updated On: Nov 19, 2014 09:35 PM IST

वीजेची तार पडून 40 एकर ऊस जळून खाक

19 नोव्हेंबर : एकीकडे अस्मानी संकटाने शेतकरी हवालदील झालाय तर दुसरीकडे वीज वितरण कंपनीची हाय टेंशन वायर तुटल्यामुळे 40 एकर ऊस जळून खाक झालाय. नागपूर जिल्ह्यातल्या सावनेरमधल्या अजनी मध्ये हा दुदैर्वी प्रकार घडलाय. सुदैवाने या अपघात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पाच शेतकर्‍यांनी आपल्या शेतात ऊस लावला होता. ऊस कापणीलाही आला होता पण शेतावरून जाणार्‍या हाय टेंशनच्या वायरमुळे शेतात आग लागली. शेतात हाय टेंशन वायर पडल्याची आणि गावात वीज गेल्याची माहिती वीज वितरण कंपनीला देण्यात आली होती. पण या संदर्भात कुठलीही शहानिशा करण्यात आली नाही आणि पुन्हा वीज सुरू करण्यात आली. त्यामुळे शेतात उसाला आग लागली. त्यात 40 एकरावरचा ऊस जळून खाक झाला.सावनेर पोलिसांमध्ये या संदर्भात गुन्हा दाखल तपास सुरू आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 19, 2014 09:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close