S M L

भाजपच्या विश्वासदर्शक ठरावाविरोधात तिसरी याचिका दाखल

Sachin Salve | Updated On: Nov 19, 2014 11:37 PM IST

Devendra_Fadnavis_swearing_in_ceremony_Wankhede_stadium_Mumbai (43)19 नोव्हेंबर : राज्य सरकारने संमत केलेल्या विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात मुंबई हायकोर्टात आज (बुधवारी) तिसरी जनहित याचिका दाखल झाली आहे. संजय लाखे-पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे.

सरकारनं बेकायदेशीर मार्गाने बहुमत सिद्ध केल्याचा भास निर्माण केलाय, असा आरोप पाटील यांनी केलाय. मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळानं जनतेची फसवणूक केली असून मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या मंत्रिमंडळाला ताबडतोब कार्यालयं रिकामी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

या प्रकरणी याचिकाकर्त्याची बाजू भारताचे अतिरिक्त महाधिवक्ता बी ए देसाई पाहत आहेत. आत्तापर्यंत यासंदर्भात तीन याचिका दाखल झालेल्या आहेत. सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर, राज अवस्थी यांनी या आधीच याचिका दाखल केली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 19, 2014 11:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close