S M L

बेस्टचा प्रवास 1 रूपयांनी महागणार ?

Sachin Salve | Updated On: Nov 19, 2014 11:51 PM IST

Image img_200192_bestbus_240x180.jpg19 नोव्हेंबर : महागाईनं होरपळणार्‍या मुंबईकरांचा प्रवास आणखी महागण्याची शक्यता आहे. बेस्टच्या भाड्यात एक रूपयाने वाढ होणार आहे.

मुंबई पालिकेनं लोकसभा निवडणुकीपूर्वी घोषित केलेले दीडशे कोटी रुपये बेस्टला न मिळाल्यामुळे बेस्ट प्रशासनाने एप्रिलपासून तिकीट दरात दोन रुपयांची वाढ प्रस्तावित केली आहे. पण हे पैसे मिळाले तर हा भार 1 रुपयाने कमी होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे बेस्ट प्रशासन आता पालिकेकडून पैसे मिळण्याची वाट पाहत आहे. पण शिवसेनेचे खासदार आणि स्थायी समितीचे सदस्य राहुल शेवाळे यांनी भाडेवाढ होणार नसल्याचा दावा केला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 19, 2014 10:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close