S M L

सरकारचं घूमजाव, जीएसटी लागू होईपर्यंत एलबीटी रद्द नाही !

Samruddha Bhambure | Updated On: Nov 20, 2014 11:47 PM IST

सरकारचं घूमजाव, जीएसटी लागू होईपर्यंत एलबीटी रद्द नाही !

FADNAVIS GOVT. ON LBT

20 नोव्हेंबर :  केंद्र सरकार जोपर्यंत जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा कर कायदा लागू करत नाही तोपर्यंत एलबीटी रद्द करता येत नाही, असं म्हणून राज्यानं केंद्राच्या कोर्टात चेंडू टोलावला आहे. विशेष म्हणजे भाजपने आपल्या 'दृष्टीपत्रात' सत्तेत आल्यास एलबीटी रद्द करू अशी घोषणाही केली होती. त्यामुळे एलबीटीबाबत आग्रही भूमिका धरणार्‍या भाजपने आता आपली भूमिका काहीशी लवचिक केल्याचं दिसत आहे.

राज्यात जीएसटी लागू होईपर्यंत एलबीटी रद्द करता येणार नाही, तर याबाबत व्यापारी संघटनांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही फडणवीस म्हणाले आहे. , आज संध्याकाळी चार वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेणार आहेत. राज्याची सध्याची आर्थिक स्थिती दुर्लक्षून चालणार नाही, अशी भूमिका राज्य सरकारनं घेतली आहे. एलबीटी आणि जकात कर रद्द करण्यामागच्या तांत्रिक अडचणी आहेत. त्याबाबतची माहिती आजच्या बैठकीत व्यापारी संघटनांना देणार असल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे.

काय आहे जीएसटी?

  • देशभरात सर्वत्र GST हा एकच कर लागू करण्याचा प्रस्ताव
  • वस्तूंची निर्मीती, विक्री, वापर याविषयीचा सर्वसमावेशक कर
  • वस्तूंच्या निर्मितीपासून विक्री होईपर्यंत प्रत्येक टप्प्यावर हा कर लागू
  • हा कर अंतिमत: ग्राहकांना लागू
  • स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांमध्ये GST ची आकारणी करायची असेल तर त्या त्या ठिकाणचा स्थानिक कर रद्द करावा लागेल
  • GST लागू करताना मुंबई महापालिका वगळता इतर 25 महापालिकांमधला LBT रद्द करावा लागेल
  • सध्या मुंबई वगळता इतर सर्व महापालिकेत LBT लागू कऱण्यात आला आहे
  • देशभरात एकच कर लागू झाल्यास करआकारणी सुलभ
  • राज्याराज्यांमध्ये असलेल्या वेगवेगळ्या करआकारणींमुळे निर्मण होणार्‍या अडथळ्यांवर उपाय
  • यामुळे अर्थव्यवस्थेला चालना आणि मदत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 20, 2014 02:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close