S M L

राज्यात सुझलॉन कंपनी विरोधात जोरदार आंदोलन

24 जून नंदूरबार तसंच अहमदनगरमध्ये मागासवर्गीयांना राज्य सरकारने कसण्यासाठी दिलेल्या जमिनी ताब्यात घेण्याचा धडाका सुझलॉन एनर्जी या पवनऊर्जा कंपनीने लावला आहे. त्यामुळे राज्यात या कंपनी विरोधातल्या आंदोलनाला जोरदार सुरुवात झाली आहे. सुझलॉनच्या अंदाधुंद कारभारामुळे कंपनीचे चेअरमन तुलसीदास थांती आणि ऐश्‍वर्या रायसह इतर 8 जणांवर ऍट्रोसिटी कायद्याच्या अंतर्गत गुन्हे दाखल होऊन कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पवन ऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीसाठी नंदूरबार जिल्ह्यातील ढंडाणे गावातल्या मागासवर्गीयांच्या जमिनी सुझलॉन कंपनीने कराराने घेतल्या होत्या. कंपनीने कराराने घेतलेल्या जमिनी सरकारने मागास समाजाला कसण्यासाठी उपलब्ध करून दिल्या होत्या. राज्यसरकारने कसण्यासाठी दिलेल्या जमिनी या मुळात विकता येत नाहीत आणि या जमिनी जिल्हाधिका-यांच्या परवानगीशिवाय विकत घेताही येत नाहीत. मात्र गरीब लोकांना निरनिराळी आमिषं दाखवून आणि फसवणूक करून या जमिनी स्वतःच्या नावांवर करून घेतल्याप्रकरणी अभिनेत्री ऐश्‍वर्या राय आणि सुझलॉन कंपनीचे चेअरमन तुलसीदास थांती यांच्यासह आठ जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबतची फिर्याद मूळ जमीन कसणारे आनंदा ठाकरे यांनी नंदूरबार पोलिसांत दिली आहे. सुझलॉन कंपनीने नंदूरबारमध्ये ढंडाणे गावात सुमारे साडेचार हजार एकर जमीन घेतल्याचं बोललं जात आहे. तसंच कायद्यातील पळवाटा शोधत या कंपनीने जमिनी विकत घेतल्याची जोरदार चर्चा आहे.सुझलॉन कंपनीने मागास समाजाच्या जमिनी गोडीगुलाबीने बळकावण्याच्या चालवलेल्या उद्योगामुळे अनेक कुटुंबं उघड्यावर आली आहेत. नंदूरबारप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातल्या गुंडेगाव, नगर, पारनेर, श्रीगोंदामधल्या वनजमिनीही सुझलॉन प्रकल्पाने बळकावल्या आहेत. पवन उर्जा प्रकल्पांच्या फे-यात मागासवर्गीय कुटुंबं भूमीहीन होत आहेत. पण सरकारी यंत्रणा सुझलॉनसारख्या खाजगी कंपन्यांवरच मेहरबान होताना दिसत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 24, 2009 10:31 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 24, 2009 10:31 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close