S M L

मुंबईकरांच्या दिमतीला भुयारी मेट्रो, 2 प्रकल्प मंजूर

Sachin Salve | Updated On: Nov 20, 2014 09:18 PM IST

मुंबईकरांच्या दिमतीला भुयारी मेट्रो, 2 प्रकल्प मंजूर

20 नोव्हेंबर : लोकलमध्ये घामांच्या धारांनी बेहाल होणार्‍या मुंबईकरांना राज्य सरकारने गारेगार दिलासा दिलाय. मुंबई मेट्रोच्या 'मेट्रो 2' आणि 'मेट्रो 5' या प्रकल्पांना राज्य सरकारने मान्यता दिली आहे. 'मेट्रो 2' प्रकल्प हा पूर्णपणे भुयारी असून दहिसर-चारकोप ते वांद्रे या मार्गावर उभारला जाणार आहे. तर मेट्रो 5 वडाळा-घाटकोपर ते कासारवडवली या मार्गावर बांधला जाणार आहे.

मुंबईकरांच्या दिमतीला मेट्रो दाखल होऊन वर्ष उलट नाही तेच मेट्रो 2 आणि 5 प्रकल्प लवकरच 'ट्रॅक'वर उतरणार आहे. आज (गुरुवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एमएमआरडीएत झालेल्या बैठकीत याबद्दल निर्णय घेण्यात आलाय. मेट्रो - 2 प्रकल्प हा दहिसर ते चारकोप ते वांद्रे ते मानखुर्द असा असणार आहे. तब्बल 40 किमी लांबीचा हा प्रकल्प आहे. विशेष म्हणजे हा पूर्णपणे भुयारी मार्ग असणार आहे. या मार्गावर एकूण 36 स्टेशन्स असणार आहे. यासाठी 25 हजार 600 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर वडाळा-घाटकोपर- ठाणे-कासारवडवली या मार्गावर मेट्रो 5 प्रकल्प उभारला जाणार आहे. 32 किमी लांबीचा हा प्रकल्प असणार आहे. यात एकूण 32 स्टेशन्स असणार आहे. यात 24 भुयारी स्टेशन्स असणार आहे आणि 8 एलिव्हेटेड स्टेशन्स असणार आहे. या प्रकल्पासाठी 19 हजार 97 कोटी खर्चाची तरतूद करण्यात आलीये. राज्य सरकारच्या या निर्णयावर आता केंद्र सरकारच्या परवानगीची प्रतिक्षा आहे.

असे असणार मेट्रो 2 आणि 5 !

मेट्रो - 2

दहिसर-चारकोप-वांद्रे-मानखुर्द

मेट्रोची लांबी - 40 किमी

पूर्ण भुयारी मार्ग

एकूण स्टेशन्स - 36

एकूण खर्च - 25 हजार 600 कोटी रु.

मेट्रो - 5

वडाळा-घाटकोपर- ठाणे-कासारवडवली

मेट्रोची लांबी - 32 किमी

एकूण स्टेशन्स - 32

24 भुयारी स्टेशन्स  

8 स्टेशन्स एलिव्हेटेड

एकूण खर्च - 19 हजार 97 कोटी

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 20, 2014 04:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close