S M L

मुंबई पालिकेच्या मध्यान्ह भोजनात किडे आढळले

Sachin Salve | Updated On: Nov 20, 2014 04:56 PM IST

मुंबई पालिकेच्या मध्यान्ह भोजनात किडे आढळले

mumbai_school20 नोव्हेंबर : मुंबई महापालिकेच्या देवनार येथील शाळेत  मध्यान्ह भोजन दिलं जातं. या भोजनात आज किडे आढळल्याची किळसवाणी घटना घडलीये. त्यामुळे विद्यार्थ्यांनी भोजन घेतलं नाही तर ज्या व्यक्तीला भोजन देण्याचा ठेका दिलाय. त्याने तत्काळ हे भोजन फेकून दिले आणि त्याबदल्यात कुरमुरे दिले असं विद्यार्थ्यांनी सांगितलं.

महापालिकेच्या या शाळेत मराठी, हिंदी आणि उर्दू असे तीनही भाषेतील शाळा भरतात. आज सकाळच्या सत्रात हिंदी भाषा वर्गात वरण भात दिला जात होता.

त्यावेळी काही मुलांना यात किडे दिसले त्यांनी आरडओरडा केला त्यावेळी ते अन्न फेकून दिले याच वेळी एका विध्यार्थ्याचे पालक तिथे आले त्यांनी हे पाहिलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 20, 2014 04:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close