S M L

यंदाचा गदिमा पुरस्कार ज्येष्ठ लेखक अरूण साधूंना जाहीर

Sachin Salve | Updated On: Nov 20, 2014 05:11 PM IST

यंदाचा गदिमा पुरस्कार ज्येष्ठ लेखक अरूण साधूंना जाहीर

arunsadhu20 नोव्हेंबर : ग.दि. माडगुळकर प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणार्‍या ग.दि.मा पुरस्कारांची घोषणा करण्यात आलीये. यंदाचा गदिमा पुरस्कार ज्येष्ठ लेखक आणि पत्रकार अरूण साधू यांना जाहीर झाला आहे.

तर चैत्रबन पुरस्कार कवी आणि गीतकार संदीप खरे यांना जाहीर झाला आहे. गदिमा स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने या पुरस्कारांची पुण्यात घोषणा करण्यात आली. विद्या प्रज्ञा पुरस्कार गायिका उर्मिला धनगर यांना देण्यात येणार आहे.

गदिमा यांच्या पत्नी विद्या माडगूळकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा गृहिणी सखी सचिव पुरस्कार ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांच्या पत्नी स्मिता परांजपे यांना जाहीर करण्यात आलाय. पुढील महिन्यात14 डिसेंबरला गदिमांच्या स्मृतीदिनाला या पुरस्कारांचं वितरण होणार असून निर्माता दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 20, 2014 04:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close