S M L

भर सभेत महिला सरपंचाला मारहाण आणि विनयभंग

Sachin Salve | Updated On: Nov 20, 2014 10:38 PM IST

भर सभेत महिला सरपंचाला मारहाण आणि विनयभंग

parner_sarpancha20 नोव्हेंबर : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील गटेवाडीमध्ये भर मासिक सभेमध्ये महिला सरपंचांना मारहाण झाल्याची आणि त्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी मारहाण करण्यार्‍या भरत गटला अटक केली मात्र त्याची जामिनावर सुटका करण्यात आलीये.

पारनेर तालुक्यातील गटेवाडीच्या सरपंच गटेवाडी येथे मंगळवारी ग्रामपंचायतीची मासिक सभा होती. सभेत आरोग्याच्या विषयावर चर्चा सुरू असतानाच ग्रामपंचायत सदस्य भरत सीताराम गट याने 'तुम्ही गावच्या विकास कामांमध्ये खर्च करता, पण आम्हाला विचारत नाही, असे म्हणून त्याने सरपंच गट यांचा हात धरून मारहाण करून विनयभंगही केला. गळयातील मंगळसूत्र ओढून तोडून टाकलं. या प्रकाराने उपस्थित महिला सदस्या आणि महिला ग्रामसेविकाही घाबरल्या. त्यांनी या प्रकाराला प्रतिकार केला. काही पुरूष सदस्यांनी या सदस्याला बाहेर काढले. याप्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर भरत गट याच्या विरोधात पोलिसांनी मारहाण,शिवीगाळ आणि नुकसान केल्याची फिर्याद दाखल करून घेतली. सदस्य भरत गट याला पोलीस निरीक्षक विवेकानंद वाखारे यांनी ताब्यात घेतलं. नंतर त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली. दरम्यान, या सरपंच महिलेचे संरक्षण करण्याऐवजी सुपा पोलिसांनी या सदस्याला एका दिवसात सोडल्याने पोलिसांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. आरोपी भारत याच्यावर सुपा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. दुसर्‍या दिवशी पोलिसांनी विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 20, 2014 10:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close