S M L

कोकणासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 5 हजार 232 कोटींचं पॅकेज

24 जून दहा वर्षांनी सिंधुदुर्गमध्ये झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोकणाला तीन वर्षांसाठी 5 हजार 232 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर झालं आहे. कोकणाला जाहीर झालेलं पॅकेज पाहता राज्यसरकार आगामी विधानसभा निवडणुकीच्या मोर्चाबांधणीची तयारी सुरू करत असल्याची चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मुख्यालय असणा-या ओरसमध्ये सकाळी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात झाली. या बैठकीला 29 मंत्र्यांची उपस्थिती होती. पण राज्यमंत्री मंडळाची ही बैठक म्हणजे मंत्र्यांची वर्षा सहल असल्याचं म्हणत सिंधुदुर्गातल्या सेना -भाजपा युतीने मोर्चा काढला. आणि बैठकीचा निषेध केला.या पॅकेजमध्ये पाटबंधारे , पर्यटन , मत्स्योत्पादन, फलोत्पादन या बाबतीतला कोकणचा अनुशेष भरून काढण्यासाठीही विशेष घोषणा करण्यात आली आहे. पॅकेजमध्ये 1 हजार 550 कोटी रुपये प्रलंबीत पाटबंधारे प्रकल्पासाठी देण्यात आले आहेत. तर कोकाणातील ग्रामीण रस्ते विकास, वाड्याजोडणी याकरता 50 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सागरी महामार्गाकरता 67 कोटी 73 लाख रुपयांची तरतूद आहे. शिवाय मत्स्योत्पादनकरता 70 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.आहे. फिशिंग जेट्टींकरता 20 कोटी रुपये तर प्रवाशी जेट्टींसाठी 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एवढे मंत्री प्रथमच सिंधुदुर्गात येत असल्यामुळे 1300 पोलीस आणि राज्य राखीव दलाच्या तीन तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 24, 2009 02:18 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 24, 2009 02:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close