S M L

विराटने दिली अनुष्कासोबतच्या प्रेमसंबंधांची जाहीर कबुली

Samruddha Bhambure | Updated On: Nov 21, 2014 11:25 AM IST

विराटने दिली अनुष्कासोबतच्या प्रेमसंबंधांची जाहीर कबुली

21 नोव्हेंबर : भारताचा क्रिकेटपटू विराट कोहलीने पहिल्यांदाच अनुष्का शर्मावरील आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान विराटने मीडियासमोर आपल्या प्रेमाची कबुली दिली.

विराट आणि अनुष्काची पहिली भेट एका जाहिरातीच्या शुटिंगदरम्यान झाली होती. यानंतर दोघांची मैत्री झाली व काही दिवसांनी दोघांचे सूत जुळल्याची चर्चा सुरु झाली. श्रीलंकेविरुद्धच्या हैद्राबादमधील वन डे मॅच बघण्यासाठी अनुष्का स्टेडियममध्ये उपस्थित होती. या सामन्यात अर्धशतक ठोकल्यावर विराटने अनुष्काला फ्लाईंग किस देताना सर्वांनीच बघितले होते. अखेर विराटने त्यांच्या प्रेमाची जाहीर कबूली दिली आहे.

आम्ही दोघेही जर वारंवार एकत्र दिसत असू तर त्यात काही वेगळं सांगायची गरज आहे का? तुम्ही आपोआप समजायला हवं. जे काही आहे ते सर्वांसमोर आहे, त्यात लपवण्यासारखं काही नाही. याबाबत वारंवार प्रश्न विचारणं चुकीचं आहे.  मीडियानी आमच्या खाजगी जीवनाबाबत आदर बाळगावा, असं सुचक विधान करत विराटने अनुष्कासोबतच्या प्रेमसंबंधांची कबुली दिली आहे.

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 21, 2014 11:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close